Shrirampur Baba Assault: श्रीरामपूरमध्ये भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार; प्रसादातून गुंगी देत अत्याचार

बेलापूरमध्ये 20 लाखांची फसवणूक; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपी अटकेत
Shrirampur Baba Assault
Shrirampur Baba AssaultPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: खडीसाखरेच्या प्रसादातून पोटदुखी बरी होण्याचा दावा करत दिलेल्या पेढ्यातून गुंगलेल्या महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बेलापूरमध्ये उघडकीस आला आहे. अंगारे-धुपारे करणाऱ्या या भोंदूने दक्षिणेच्या नावाखाली सुमारे 20 लाख रुपयांना गंडाही घातला. आजार बळावण्याची भीती घालून अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने दिल्यानंतर पोलिसांनी बेलापूरच्या गणेश शिंदे या भोंदूला अत्याचार व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे अटक केली.

Shrirampur Baba Assault
Ashok Kharat: ‘समता’ पतसंस्थेवर सहकार विभागाचा शिक्का; KYC चौकशी सुरू

संबंधित महिला श्रीरामपूर परिसरातील रहिवासी आहे. 2023 मध्ये तिला पोटाचा अल्सरचा त्रास सुरू झाला. बेलापूर खटकाळी येथील गणेश माधवराव शिंदे महाराज यावर इलाज करून दुखणे बरे करतो, असे तिला कळाले. ती गणेश महाराजाकडे गेली. तेथे महाराजाने लिंबू व उदी पाण्यात टाकून प्यायला दिले. ते प्याल्यानंतर महिलेला चक्कर आली.

Shrirampur Baba Assault
Nevasa IPL Betting: नेवासा तालुक्यात आयपीएल सट्टेबाजीचे जाळे; तरुणांचे भविष्य धोक्यात

मात्र काही वेळाने फरक पडल्याची जाणीव झाली. त्यापोटी भोंदूने 15 हजार रुपये मागितले आणि पाच दिवसांनंतर परत येण्यास सांगितले. पीडिता त्यानंतर वारंवार आश्रमात गेली. काही दिवसांनी भोंदूने तिला धमकावत पुन्हा आश्रमात बोलावले. न आल्यास पोटदुखी पुन्हा सुरू होण्याची भीती घातली. त्या भीतीपोटी पीडितेच्या आश्रमखेटा वाढल्या. प्रत्येक वेळी भोंदूने दक्षिणा म्हणून पैशांची किंवा सोन्याची मागणी केली.

Shrirampur Baba Assault
Ahilyanagar Revenue Reforms: महसूल कायद्यात बदल; नागरिकांना जलद न्याय देणार – बावनकुळे

पीडितेने दक्षिणा म्हणून आतापर्यंत सुमारे 20 लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ऑगस्ट 2025 मध्ये पीडितेच्या घरी तसेच जानेवारी 2026 मध्ये आश्रमात भोंदूने तिच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून भोंदू गणेश माधवराव शिंदेविरुद्ध अत्याचार व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.

Shrirampur Baba Assault
Ahilyanagar PM E-Bus: अहिल्यानगरमध्ये लवकरच पीएम ई-बस सेवा; डेपोचे काम अंतिम टप्प्यात

खडीसाखर, पेढा व उदीचा प्रसाद

पीडित महिला दुसऱ्यांदा आश्रमात गेली आणि त्याला 15 हजार रुपये दिले. त्याने प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा व उदी मिक्स करून खाण्यास दिला. तो प्रसाद खाल्ल्याने महिलेला चक्कर आली. तेव्हा भोंदू गणेश घराच्या मागील खोलीत जात, महिलेला इशाऱ्याने बोलावून घेतले. गुंगीतच ती त्याच्यामागे गेली. खोलीत भोंदूने रांगोळी काढून रिंगण आखले आणि महिलेला लिंबूपाण्यात एक पुडी टाकून प्यायला देत अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news