Ahilyanagar PM E-Bus: अहिल्यानगरमध्ये लवकरच पीएम ई-बस सेवा; डेपोचे काम अंतिम टप्प्यात

केडगाव येथे चार्जिंग स्टेशन सज्ज; पहिल्या टप्प्यात 20 बस शहरात धावणार
PM E-Bus
PM E-BusPudhari
Published on
Updated on

नगर: केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. केडगाव येथे पीएम ई बससाठी चार्जिंग स्टेशन व बस डेपो करण्यात येत असून, डेपोचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शहराला पहिल्या टप्प्यात वीस बस मिळणार आहेत.

PM E-Bus
Sanjay Gaikwad Controversy: गायकवाड धमकी प्रकरण तापले; ‘शिवाजी कोण होता?’ पुन्हा चर्चेत

पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने 16 ऑगस्ट 2023 रोजी 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 169 शहरांना तब्बल 10 हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 20 ते 40 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 150, 10 ते 20 लाख व 5 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 100 व 5 लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगर शहराला गरजेनुसार 35 सीटच्या 40 बसेस उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 20 बस येणार आहेत.

PM E-Bus
Ahilyanagar Sispe Scam: सिस्पे घोटाळा उघड; 278 कोटींची मालमत्ता निष्पन्न, 12 जण अटकेत

पीएम ई बस चार्जिंग स्टेशन व बस डेपोचे केडगाव येथे अडीच एकर जागेत काम सुरू असून, जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सोनेवाडी सब स्टेशनपासून महापालिकेच्या सबस्टेशनपर्यंत विजेचा पुरवठा करणारी उच्च दाब वाहिनी टाकण्याचे काम महावितरणमार्फत अद्यापि सुरू झालेले नाही. त्यासाठी रक्कम महापालिकेने महावितरणला भरली आहे. या कामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून त्यासाठी 1 कोटी 97 लाखांचा निधी थेट महावितरणकडे वर्ग झाला आहे.

PM E-Bus
Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: कर्जत-चिलवडीत अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

तसेच, चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी 9.06 कोटी रुपये मंजूर असून ते काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले आहे. अंतर्गत डीपी व वायरिंगचे काम बाकी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण काम पूर्ण होऊन अहिल्यानगर शहरात पीएम ई बस धावणार आहे. केंद्र शासनाने जाहिर ई निविदे द्वारे देशातील 169 शहरांना बसेस पुरविणेसाठी कंपनीची निवड केलेली आहे.

PM E-Bus
Rahuri Mobile Tower Battery Theft: राहुरीत मोबाईल टॉवरवर डल्ला; 75 हजारांच्या बॅटऱ्या लंपास

पीएम ई बस डेपोचे काम आता अंतिम टप्प्यात असून, सिव्हील वर्कचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. महावितरणची मुख्य वाहिनी आणि अंतर्गत किरकोळ काम प्रगतिपथावर आहे. येत्या काही दिवसांत ते काम पूर्ण होणार असून, लवकरच शहरात पीएम-ई बस धावणार आहे.

यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news