Nevasa IPL Betting: नेवासा तालुक्यात आयपीएल सट्टेबाजीचे जाळे; तरुणांचे भविष्य धोक्यात

ग्रामीण भागात लाखोंची उलाढाल; पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी
Online Betting
Online BettingPudhari
Published on
Updated on

नेवासा: सध्या आयपीएल क्रिकेटचा महासंग्राम रंगात आला असताना शहरांसोबतच ग्रामीण भागातही सट्टेबाजीचे जाळे वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. नेवासा तालुक्यातील सोनई, शनिशिंगणापूर आणि घोडेगाव परिसरात छुप्या पद्धतीने आयपीएलवर सट्टा खेळवला जात असल्याची चर्चा जोर धरत आहे.

Online Betting
Ahilyanagar Revenue Reforms: महसूल कायद्यात बदल; नागरिकांना जलद न्याय देणार – बावनकुळे

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सट्टेबाजीमध्ये ग्रामीण भागातील अनेक तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत असून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात पैसे गमावून कर्जबाजारी झाले असून काहींवर तर गाव सोडण्याची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Online Betting
Ahilyanagar PM E-Bus: अहिल्यानगरमध्ये लवकरच पीएम ई-बस सेवा; डेपोचे काम अंतिम टप्प्यात

विशेष म्हणजे शनिशिंगणापूर सारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातही हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धार्मिक स्थळाच्या पवित्रतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक पोलिसांना या सट्टेबाजीची माहिती असल्याची चर्चा असली तरी ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Online Betting
Sanjay Gaikwad Controversy: गायकवाड धमकी प्रकरण तापले; ‘शिवाजी कोण होता?’ पुन्हा चर्चेत

तेरी भी चूप, मेरी भी चूप अशा पद्धतीने हा सट्टा गुपचूप चालत असल्याने अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. यामुळेच सट्टेबाजांचे जाळे अधिक बळकट होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Online Betting
Ahilyanagar Sispe Scam: सिस्पे घोटाळा उघड; 278 कोटींची मालमत्ता निष्पन्न, 12 जण अटकेत

या प्रकारामुळे युवकांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. सट्टेबाजीमुळे आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत असून कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कठोर कारवाईची गरज

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागात वाढत्या सट्टेबाजीच्या प्रकारामुळे सामाजिक व आर्थिक परिणाम गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news