Shrirampur Assault Case: श्रीरामपूरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; नगरसेवकासह 7–8 जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला; टोळीयुद्धाच्या दिशेने पोलिसांचा तपास
Dispute
DisputePudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: जुन्या वादातून एका तरुणाला रस्त्यात अडवून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गोंधवणी शिवारात काल घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात नगरसेवकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला टोळीयुद्धाची झालर आहे का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

Dispute
Shani Shingnapur Prasadalaya: शनिशिंगणापूरचे प्रसादालय 9 महिन्यांपासून बंद; भाविकांकडून तीव्र नाराजी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोंधवणी येथील प्रशांत कहाणे हा त्याचा सिन्नर तालुक्यातील मित्र अविनाश वारुनगसे याच्या चारचाकी गाडीतून सोमवारी रात्री ९.३० वाजता बेलापूर-श्रीरामपूर रोडवरील दुकानातून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे गोंधवणी येथे घरी जात होता. त्याचवेळी एज्युकेशन शाळेजवळील त्रिमूर्ती ग्लास अँड ॲल्युमिनियम वर्क दुकानासमोर ९.४५ वाजेच्या सुमारास रोडवर कहाणे यांच्या कारसमोर अज्ञात तरुणांनी दोन मोटारसायकली आडव्या लावल्या. कहाणे यांची गाडीचा वेग कमी होताच, बाजुला दडी धरून बसलेल्या सहा-सात इसमांनी हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन कहाणेकडे धाव घेतली. एकाच्या हातात बंदुकीसारखे काहीतरी शस्त्र दिसले. कहाणे याने आपल्यावर हल्ला होणार असल्याचे लक्षात घेऊन गाडी पुढे पळवली.

Dispute
Pathardi Police Firing Case: पाथर्डीत पोलिसांवर गोळीबार प्रकरण; तीन साथीदारांना अटक, दोघांचा शोध सुरू

मात्र ‘त्या’ टोळीने गाडीवर लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला चढवत पाठलाग सुरूच ठेवला. कहाणे हे गोंधवणीपर्यंत पोहचले. मात्र सुतगिरणीच्या पुढे जात असताना, टोळक्याने पुन्हा त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. मात्र कहाणे यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा वेग वाढवून थेट पोलिस स्टेशनमध्ये गाठले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात प्रशांत देविदास कहाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अर्जुन दाभाडे व त्याच्या टोळीचे किरण बोरकर, विकी ढमके, नमोद कांबळे, विवेक दाभाडे व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Dispute
Rahuri Farm Loan Waiver Protest: राहुरीत कर्जमाफीसाठी चक्काजाम; शिवसेना शेतकरी सेनेचा सरकारविरोधात एल्गार

चौघे हद्दपार

श्रीरामपूर उपविभागातील चार जणांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यात श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान व भोकर येथील प्रत्येकी एक, असे दोन तर राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड व बारागाव नांदुर येथील प्रत्येकी 1, असे दोन अशा एकूण 4 जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील अरिफ गफूर शेख यास राहुरी, नेवासा व नगर तालुका तसेच पुणे जिल्हयातील शिरुर तालुका हद्दीतून १ वर्षासाठी हद्दपार केले.

Dispute
Ahilyanagar Census Survey: जनगणना घरगणनेत अहिल्यानगर महापालिका राज्यात दुसरी; 21 दिवसांत पूर्ण केले उद्दिष्ट

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील योगेश सोपान बाचकर यास अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा व नगर तालुका हद्दीतून १ वर्षासाठी हद्दपार केले. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सनी उर्फ रितेश खंडू जाधव यास श्रीरामपूर, राहुरी, नेवासा व राहाता तालुका हद्दीतून १ वर्षासाठी हद्दपार केले. तर भोकर येथील अक्षय अशोक मते यास श्रीरामपूर, राहुरी, नेवासा व राहाता तालुका हद्दीतून १ वर्षासाठी हद्दपार केले आहे.

कहाणेंवरील हल्ल्याची नेमकी ‘कहाणी’ काय?

सोमवारी मध्यरात्री श्रीरामपूरात गोळीबार झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, काल पोलिस ठाण्यात लाकडी दांडके, लोखंडी रॉडने गाडीवर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे गोळीबाराची घटना का दाबली गेली, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, कहाणे यांच्यावरील हल्ल्यामागेही टोळीयुद्ध आणि खबर दिल्याच्या संशयाची किनार असल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news