Pathardi Police Firing Case: पाथर्डीत पोलिसांवर गोळीबार प्रकरण; तीन साथीदारांना अटक, दोघांचा शोध सुरू

जबरी चोरीच्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला; न्यायालयाने आरोपींना 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या साथीदारांना पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. सुदाम बबन राठोड (वय २५, दुर्गानगर तांडा), कृष्णा बाळू पवळे (वय २४, खरवंडी) आणि इब्राहिम महंमद सय्यद (वय १९, खरवंडी) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

Guns
Rahuri Farm Loan Waiver Protest: राहुरीत कर्जमाफीसाठी चक्काजाम; शिवसेना शेतकरी सेनेचा सरकारविरोधात एल्गार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकोट पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पावलस ऊर्फ मेहेर कचरू गायकवाड याला पकडण्यासाठी ४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे पथक पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आले होते.

Guns
Ahilyanagar Census Survey: जनगणना घरगणनेत अहिल्यानगर महापालिका राज्यात दुसरी; 21 दिवसांत पूर्ण केले उद्दिष्ट

पाथर्डी पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरासमोर पोलिस पथक पोहोचले असता आरोपीने पोलिस शिपाई आसाराम बटुळे यांच्यावर गोळी झाडली. ती जवळून गेल्याने अनर्थ टळला. गोळीबारानंतर आरोपी साथीदारांसह वाहनातून पसार झाला.

Guns
Ahilyanagar Fodder Stock: अहिल्यानगरात 73 लाख टन चाऱ्याचा साठा; पशुधनासाठी सात महिने दिलासा

पाथर्डी पोलिसांनी निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. ९ जून रोजी पहाटे आरोपी खरवंडी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेण्यात आले.

Guns
Ahilyanagar Ashadhi Wari Fund: आषाढी वारीसाठी अहिल्यानगरला 3.86 कोटींचा निधी; वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्यक सुविधा

चौकशीदरम्यान त्यांनी आणखी दोन साथीदारांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने त्यांना ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल लहाने तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news