Shani Shingnapur Prasadalaya: शनिशिंगणापूरचे प्रसादालय 9 महिन्यांपासून बंद; भाविकांकडून तीव्र नाराजी

दररोज हजारो भाविकांची गैरसोय; टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रसादालय लवकर सुरू करण्याची मागणी
Shani Shingnapur Prasadalaya
Shani Shingnapur PrasadalayaPudhari
Published on
Updated on

नेवासा: जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानावर प्रशासकराज आल्यापासून देवस्थानामार्फत चालविले जाणारे प्रसादालय चक्क गेल्या ९ महिन्यांपासून बंद आहे. परिणामी दररोज हजारो भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून प्रसादालय तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

Shani Shingnapur Prasadalaya
Pathardi Police Firing Case: पाथर्डीत पोलिसांवर गोळीबार प्रकरण; तीन साथीदारांना अटक, दोघांचा शोध सुरू

शनैश्वर देवस्थानामार्फत भाविकांसाठी अल्प दरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी देवस्थानचे वाहनतळा जवळ भव्य प्रसादालय आहे. या प्रसादालयात दररोज सुमारे दोन अडीच हजार भाविक भोजनाचा लाभ घेत होते. चपाती, भाजी, शिरा, वरण-भात यांसह विविध पदार्थांचा महाप्रसाद उपलब्ध करून दिला जात होता. देश-विदेशातील भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत होते.

Shani Shingnapur Prasadalaya
Rahuri Farm Loan Waiver Protest: राहुरीत कर्जमाफीसाठी चक्काजाम; शिवसेना शेतकरी सेनेचा सरकारविरोधात एल्गार

महाप्रसादाच्या सेवेसाठी अनेक उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या जात होत्या. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातील उद्योजक माटा यांनी सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक किचन यंत्रणा प्रसादालयासाठी उपलब्ध करून दिली, मात्र ७ सप्टेंबर २०२५ पासून हे प्रसादालय बंद असल्याने त्या सुविधांचाही वापर होत नसल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन विश्वस्त समितीने किचन मधील अंतर्गत विकासकामांसाठी प्रसादालय तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते आणि ते ३० सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच २२ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने देवस्थान बरखास्त करून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश काढला.

Shani Shingnapur Prasadalaya
Ahilyanagar Census Survey: जनगणना घरगणनेत अहिल्यानगर महापालिका राज्यात दुसरी; 21 दिवसांत पूर्ण केले उद्दिष्ट

त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी देवस्थानाचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर परत जुन्या विश्वस्त समितीने या निर्णया विरोधात खंडपीठात याचिका केल्याने खंडपीठाने परत तत्कालीन विश्वस्त समिती कडे कारभार सोपवण्याचा आदेश दिला. यानंतर राज्य सरकारने परत सर्वांच्च न्यायालयात निर्णयाला आवाहन दिले. यानंतर सर्वाच्च न्यायालयाने नाशिक विभागीय आयुक्त यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले. प्रशासक डॉ.प्रवीण गेडाम यांनी १९ डिसेंबर२०२५ रोजी पदभार घेतला. डॉ. गेडाम यांनी सुरूवातीला महिनाभर प्रत्येक आठवड्याला देवस्थान कारभार सुरळीत करण्यासाठी बैठका घेतल्या. त्यांना मदत करण्यासाठी भुसंपादन वर्ग १चे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची 'कार्यकारी अधिकारी' म्हणून नेमणूक केली. नगरचे प्रांतधिकारी सुधीर पाटील यांना मदतीला 'सहायक' म्हणून नेमणूक केली होती.

Shani Shingnapur Prasadalaya
Ahilyanagar Fodder Stock: अहिल्यानगरात 73 लाख टन चाऱ्याचा साठा; पशुधनासाठी सात महिने दिलासा

मागील महिन्यात कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी प्रसादलायाचे बाबत २४ एप्रिल रोजी वर्तमानपत्रात टेंडर प्रसिद्ध केले होते. याबाबत टेंडर धारकांनी निविदा भरल्या, पण नियमानुसार अजूनही तांत्रिक तपासणी सुरु असल्याने प्रसादालय लवकरच सुरु करू असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण सध्या प्रसादालय बंद असल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सुट्या असल्याने शनिशिंगणापूरमध्ये अलोट गर्दी होत आहे प्रसादालय कधी सुरु होणार याबाबत शेकडो भाविक विचारणा करत आहेत. टेंडर प्रक्रियाला विलंब न लावता लवकर प्रसादालय सुरु करावे.

भागवत कराळे, व्यावसायिक, शनिशिंगणापूर

सध्या टेंडर बाबत तांत्रिक तपासणी झाली की त्यातील पात्र लोकांचे दर ओपन करणार आणि त्यांनतर वर्क ऑर्डर प्रसिद्ध होईल.

अतुल चोरमारे, कार्यकारी अधिकारी, शिंगणापूर देवस्थान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news