Shrigonda Delhi Gate: श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक दिल्ली वेशीला धोका; जेसीबीने खोदकाम, वारसा संवर्धनासाठी संताप

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची कारवाईची मागणी; ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
ahilyanagar news
ahilyanagar newsPudhari
Published on
Updated on

श्रीगोंदा: शहरातील दिल्ली वेशीनजीक काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्याने वेशीच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचला आहे. काही दिवसांत ही वेस नामशेष होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

ahilyanagar news
Ahilyanagar School Assault Case: अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; मुख्याध्यापकांकडून तिसरीतील विद्यार्थ्याला मारहाण, हाताचा घेतला चावा

शहरातील दिल्ली वेस येथे जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केलेले खोदकाम तत्काळ थांबविण्यात येऊन पूर्ववत करण्यात यावे, यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन संस्थेतर्फे आ. विक्रमसिंह पाचपुते, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. याची प्रत जिल्हाधिकारी , पुरातन विभाग नाशिक यांनाही पाठविण्यात आली आहे. शिवदुर्ग संस्था पाच वर्षांपासून ही वेस जतन करण्यासाठी व वारसा स्मारक होण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करत असताना ही घटना उघडकीस आली आहे.

ahilyanagar news
Akole Municipal President Election: अकोल्यात सोनाली नाईकवाडी पुन्हा नगराध्यक्ष; ११-६ मतांनी वैष्णवी धुमाळ यांचा पराभव

राज्य सरकारने १९८२मध्ये परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांना कळवले आहे की, पुरातन असंरक्षित स्मारकांपासून १०० फूट अंतरावर कोणतेही नवीन बांधकाम अथवा खोदकाम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असताना श्रीगोंदा नगरपालिका प्रशासन हे वारसा संवर्धनाबाबतीत कोणतीच दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे वारसा संवर्धन करण्याऐवजी वारसा नामशेष करण्याकडे श्रीगोंदा शहरातील समाजविघातक शक्तींना बळ मिळत आहे.

ahilyanagar news
Maratha Reservation: 'मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही'; राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा

दिल्ली वेस परिसरात पश्चिम बाजूच्या भव्य बुरुजाच्या पायथ्याशी दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. होणारे खोदकाम तत्काळ थांबवून सदरील अज्ञात व्यक्तींवर पुरातन वास्तू उद्‌ध्वस्त करण्याचा मुद्दाम प्रयत्न केल्याबाबत गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवदुर्ग संस्थेतर्फे तहसीलदार, मुख्याधिकारी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

ahilyanagar news
Ahilyanagar school incident | प्राचार्यांनी तिसरीच्या विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबून हवेत उचलले

ऐतिहासिक घटनांची साक्षीदार

दिल्ली वेस वारसा म्हणून शहराची ओळख असली तरी हा भारताचा इतिहास आहे. इथला इतिहास खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले, श्रीगोंद्याचे पाटील महादजी शिंदे, पानिपत युद्ध व दिल्ली विजय या ऐतिहासिक घटनांची साक्षीदार ही वेस आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी नागरिकांच्या अस्मितेवर घाला घालण्यात आला आहे. या घटनेची तत्काळ गंभीर नोंद घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news