Shirdi Devotee Fraud Action: शिर्डीत भाविकांची अडवणूक बंद; फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

प्रशासनाचा कठोर आदेश कायम; रस्त्यावर मध्यस्थी व अनधिकृत व्यवहारांना पूर्ण बंदी
Shirdi
ShirdiPudhari
Published on
Updated on

शिर्डी: साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रस्त्यात अडवणूक करून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाने 2 फेब्रुवारी रोजी काढलेल्या प्राथमिक आदेशावरील आक्षेप फेटाळून लावत सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भाविकांना थांबवणे, फसवणे किंवा त्यांची दिशाभूल करणे या कृत्यांवर तत्काळ बंदी घातली आहे. दरम्यान, या नवीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Shirdi
Shevgaon Illegal Murum Case: बेकायदा मुरूम डंपर पलटी; महसूल सेवक गंभीर जखमी

शिर्डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान असल्याने येथे देश-विदेशातून लाखो भाविक येतात. सण-उत्सवांच्या काळात ही गर्दी अधिक असते. याचा गैरफायदा घेत काही लोक रस्त्यावर गाड्या अडवून भाविकांना खासगी पार्किंगमध्ये जाण्यास भाग पाडतात. तसेच, अवाजवी दराने पूजासाहित्य घेण्याची सक्ती करणे किंवा जलद दर्शन करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रकारही वाढले आहेत.

Shirdi
Deulgaon Siddhi Murder Case: देऊळगाव सिद्धीतील मृत्यू नव्हे तर खून; एलसीबी तपासात धक्कादायक उघड

भाविकांनी विरोध केल्यास त्यांना दमदाटी व धक्काबुक्की केली जाते. बाहेरगावचे भाविक तक्रार करायला घाबरत असल्याने, स्थानिक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गेल्या दोन वर्षांत तब्बल 65 गुन्हे दाखल केले आहेत. या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिस, श्री साईबाबा संस्थान व नगरपरिषद यांच्या अहवालानुसार उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी 2 फेब्रुवारी रोजी एक प्राथमिक आदेश काढला होता.

Shirdi
Nagar Onion: नगर तालुक्यातील कांद्याला रोगांचा विळखा; गडगडलेल्या भावांमुळे बळीराजा दुहेरी संकटात

कोणाच्याही कायदेशीर रोजगारावर गदा येणार नसून, केवळ उपद्रव करणाऱ्यांना रोखले जाणार असल्याचे स्पष्ट करत उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी आदेशाविरोधातील आक्षेप फेटाळून लावत 2 फेब्रुवारीचा आदेश कायमस्वरूपी लागू केला. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिर्डी पोलिसांना दिल्या असून, नियम मोडणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलमांनुसार कारवाई केली जाणार आहे.

Shirdi
Miri Jal Jeevan Yojana: मिरी जलजीवन योजनेतील दिरंगाईविरोधात रास्ता रोको; प्राजक्त तनपुरेंचा अधिकाऱ्यांवर सवालांचा भडिमार

भाविकांशी मध्यस्थी करण्यास मनाई

या नव्या आदेशानुसार रस्ते, चौक, बसस्थानक किंवा प्रवेश मार्गावर उभे राहून भाविकांशी मध्यस्थी करण्यावर पूर्णपणे मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला संस्थानचा किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून निवास, भोजन किंवा दर्शनाच्या नावाखाली अनधिकृत व्यवहार करू नयेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news