Shevgaon Illegal Murum Case: बेकायदा मुरूम डंपर पलटी; महसूल सेवक गंभीर जखमी

शेवगाव तालुक्यात कारवाईदरम्यान चालकाची धाडसी कृती; मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Shevgaon Illegal Murum Case
Illegal Murum CasePudhari
Published on
Updated on

ढोरजळगाव: बेकायदा मुरूम वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाईसाठी शेवगावकडे नेत असताना चालकाने मुद्दामहून पलटी केली. त्यात महसुल कर्मचारी गंभीर जखमी झाला. शेवगाव तालुक्यातील आपेगाव परिसरात ही घटना घडली. सोमनाथ सर्जेराव साबळे (खरडगाव) असे जखमी महसुल कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याच फिर्यादीवरून पोलिसांत संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले व चालक (नाव माहीत नाही) (रा.आखतवाडे ता.शेवगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shevgaon Illegal Murum Case
Deulgaon Siddhi Murder Case: देऊळगाव सिद्धीतील मृत्यू नव्हे तर खून; एलसीबी तपासात धक्कादायक उघड

गौण खनिजाची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी शेवगाव तहसीलदार आकाश दहाडदे यांनी नायब तहसीलदार राजेश बकरे, ग्राम महसूल अधिकारी राजेश राठोड, सोमनाथ आमने, मनोहर कर्डिले, महसूल सेवक सोमनाथ साबळे यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागातील ढोरा नदी पात्रातून वाळू आणि परिसरातून अवैध मुरूम तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. गुरूवारी (दि.26) महसूल पथक अमरापूर मार्गे खासगी वाहनाने आव्हाने वडुले खुर्द आखतवाडे, आपेगाव, ढोरजळगाव येथे गस्त करून शेवगावकडे येत होते. आपेगाव येथील शेळके वस्तीजवळ शेवगाव-मिरी रोडवर विना नंबरचा डंपर येताना पथकाला दिसला.

Shevgaon Illegal Murum Case
Nagar Onion: नगर तालुक्यातील कांद्याला रोगांचा विळखा; गडगडलेल्या भावांमुळे बळीराजा दुहेरी संकटात

पथकाने चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने डंपर सुसाट पळविला. महसूल पथकाने पाठलाग करून डंपर अडविला. डंपरमधील मुरूमाची रॉयल्टी मागितली, पण चालकाने ती नसल्याचे सांगितले. चालकाने ही बाब डंपर मालकास फोनवरून कळविली. मालक तेथे पोहचल्यानंतर डंपर कारवाईसाठी शेवगाव तहसील कार्यालयात घेवून जात असल्याचे पथकाने सांगितले.

Shevgaon Illegal Murum Case
Miri Jal Jeevan Yojana: मिरी जलजीवन योजनेतील दिरंगाईविरोधात रास्ता रोको; प्राजक्त तनपुरेंचा अधिकाऱ्यांवर सवालांचा भडिमार

चालकाला बाजुला करत मालकाचा मुलगा शुभम उगले याने डंपरचे स्टेअरिंग हाती घेतले. डंपरमध्ये महसुल सेवक सोमनाथ साबळे बसले होते. आपेगाव-आव्हाने मार्गे डंपर शेवगावकडे येत असताना चालक शुभम याने रस्त्यावरच ट्रॉली वरती करत मुरूम रस्त्यावरच टाकला. डंपर पलटी करून तुला ठार मारतो, अशी धमकी साबळे यास दिली. आव्हानेच्या दिशेने भरधाव वेगात पळणारा डंपर अचानक पलटी झाला. त्यात साबळे हे जखमी झाले. डंपरमागेच असलेले महसूलपथक येईपर्यंत चालक शुभम उगले हा पसार झाला होता. महसूल पथकाने जखमी साबळे यांना डंपरच्या बाहेर काढूत रुग्णालयात दाखल केले.

Shevgaon Illegal Murum Case
Tapovaneshwar Mahadev Temple: विनायकनगरमध्ये तपोवनेश्वर महादेव मंदिराची स्थापना; आमदार संग्राम जगताप यांचा धार्मिक एकतेचा संदेश

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आकाश दहाडदे यांनी पोलिस पथकासह आव्हाने येथे धाव घेतली. जेसीबीने डंपर शेवगाव येथे आणला. महसूल सेवक सोमनाथ सर्जेराव साबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले व चालक (रा.आखतवाडे ता.शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news