Sangamner Water Shortage: संगमनेर तालुक्यात दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई; ९ गावांसह १७ वाड्यांना टँकरचा आधार

जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; निळवंडे धरणातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

संगमनेर: यंदा दिवाळीपुर्वीच तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागली असून टँकरची मागणी हळूहळू वाढत आहे. सध्या नऊ गावांसह १७ वाड्यांना ९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दिली आहे.

Water Tanker
Ahilyanagar Medicine Purchase: अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून कोट्यवधींची औषध खरेदी; ५० लाख पॅरासिटामॉल गोळ्यांचा समावेश

यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात ऑक्टोबर महिन्यातच जनावरांच्या चारा, पाणी व रोजगार हमीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीनंतर दुष्काळाच्या झळा अधिक जाणवणार आहे. सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असून ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर पाणी टंचाई जाणवु लागली आहे. यातच आता जनावरांसाठी चारा व त्यांच्याही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Water Tanker
Ahilyanagar Sugarcane Price: अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा; कारखानदारांची घोषणा रखडली

शेतीची कामे तसेच शेतमजूरांना रोजगार उपलब्ध नसल्याने रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागात होत आहे. शासकीय पातळीवर विविध उपाययोजना करणे गरजेचे असून सणासुदीच्या काळात समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पठार भागात परिस्थिती गंभीर असून यंदाचा दुष्काळाने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Water Tanker
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेत भाजपचा वरचष्मा; राष्ट्रवादीला जागावाटपात फटका

त्यामुळे अनेक शेतकरी जनावरे बाजारात विकत असून शासनाने तातडीने चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. सध्या संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. पंचायत समितीकडून ९ गावे, १७ वाड्यांना ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एप्रिल महिन्यापासूनच तालुक्यात काही गावांत टँकर सुरु केले होते. त्यातील टँकर आजही सुरू असून पुढेही सुरूच राहणार आहे.

Water Tanker
Ahilyanagar Water Shortage: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; १९४ गावांतील विहिरी कोरड्या

उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा व निळवंडे ही दोन धरणे भरली ही एकमेव जमेची बाजु आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून निळवंडे धरणातुन आवर्तन सोडले ते सुरुच असल्याने हे पाणी थांबवावे, अशी मागणी संगमनेर व अकोल्यातील शेतकरी करीत आहे.

आवर्तन बंद करण्याची मागणी

निळवंडे धरणातून गेल्या काही दिवसांपासून प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडले आहे. हे आवर्तन सध्या सुरुच असून ही पाण्याची उधळपट्टी असल्याचा आरोप संगमनेर, अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गरज नसतानाचे आवर्तन तातडीने बंद करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news