Ahilyanagar Medicine Purchase: अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून कोट्यवधींची औषध खरेदी; ५० लाख पॅरासिटामॉल गोळ्यांचा समावेश

जेईएम पोर्टलवर १९९ प्रकारच्या औषधांची निविदा; मागील पाच वर्षांच्या खरेदीचे लेखापरीक्षण करण्याची छत्रपती प्रतिष्ठानची मागणी
Medicine
MedicinePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जेईएम पोर्टलवर औषधे खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या खरेदीत १९९ प्रकारच्या औषधांचा समावेश आहे. सुमारे कोट्यावधी रुपयांच्या या खरेदीत पॅरासिटामॉलच्या ५० लाख गोळ्यांसह विविध औषधांच्या समावेश आहे. दरम्यान, गोळ्या, इंजेक्शन, सिरप व मलम, बँडेज, ऑपरेशन साहित्य, इतर औषधांचा या खरेदीत समावेश आहे.

Medicine
Ahilyanagar Sugarcane Price: अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा; कारखानदारांची घोषणा रखडली

दि. २४ सप्टेंबर रोजी जेईएम पोर्टलवर प्रसिद्ध निविदेतील तपशिलानुसार, पॅरासिटामॉल ५० लाख गोळ्या, सेटिरीझिन ३५ लाख गोळ्या आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएटच्या ४० लाख गोळ्यांचा समावेश आहे. फ्युराझोलिडोनच्या १०० मिलिग्रॅमच्या ३० लाख गोळ्यांची मागणी आहे. याशिवाय ट्रामाडोल ५० मिलिग्रॅमच्या तीन लाख गोळ्या, रॅनिटिडिन १५० मिलिग्रॅमच्या पाच लाख गोळ्या, तर लॉराझेपाम दोन मिलिग्रॅमच्या ५० हजार गोळ्यांचा समावेश आहे.

Medicine
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेत भाजपचा वरचष्मा; राष्ट्रवादीला जागावाटपात फटका

फेनोबार्बिटोन सोडियम ३० मिलिग्रॅमच्या १५ हजार आणि फेनिटॉइन सोडियम १०० मिलिग्रॅमच्या २५ हजार गोळ्यांचीही मागणी आहे. त्वचारोगावरील क्लोबेटासोल मलमाच्या १५ हजार ट्यूब, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, संसर्ग आणि इतर आजारांवरील औषधांचाही या खरेदीत समावेश आहे. सर्पदंश आणि रेबीजविरोधी औषधांचाही निविदेत समावेश असल्याचे दिसते. या औषध खरेदीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील रुग्णांना लाभ होणार आहे.

Medicine
Ahilyanagar Water Shortage: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; १९४ गावांतील विहिरी कोरड्या

लेखापरीक्षण अहवालाची तपासणी व्हावी!

मागील पाच वर्षांत कोणत्या कंपन्यांना पुरवठ्याची संधी मिळाली, एकाच कंपनीला वारंवार मोठ्या प्रमाणावर काम मिळाले आहे का, औषधांचे दर मागील वर्षांच्या तुलनेत वाढले की कमी झाले, निविदेत सहभागी झालेल्या कंपन्यांची संख्या किती होती आणि पात्र कंपन्यांमध्ये किती स्पर्धा झाली, पॅरासिटामॉलसारख्या मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या औषधांचे प्रमाण कोणत्या निकषांवर निश्चित करण्यात आले,

Medicine
Bhanudas Kotkar: ज्येष्ठ काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांचे निधन

मागील खरेदीतील शिल्लक साठ्याचा विचार करूनच नवीन मागणी नोंदविण्यात आली का, औषधांची गुणवत्ता तपासणी, मुदत आणि प्रत्यक्ष वितरणावर कोणाचे नियंत्रण आहे, तसेच खरेदी प्रक्रियेचे लेखापरीक्षण करून काही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी मागील पाच वर्षांचे निविदा दस्तऐवज, पुरवठादारांची नावे, औषधनिहाय दर, खरेदी आदेश आणि लेखापरीक्षण अहवाल तपासणी करावी, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news