Sangamner Drought Declaration: संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

प्रांताधिकारी कार्यालयात संतप्त शेतकरी घुसले; खुर्ची पाडून घोषणाबाजी, बाळासाहेब थोरातांचे ठिय्या आंदोलन
Sangamner Drought Declaration
Sangamner Drought DeclarationPudhari
Published on
Updated on

संगमनेर: भारनियमना विरोधात व संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्याच्या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.२२) आक्रोश मोर्चा काढला. मात्र निवेदन घेण्यासाठी प्रांताधिकारीच नसल्याने काही संतप्त शेतकरी थेट प्रांताधिकारी कार्यालयात घुसले. यावेळी एका शेतकऱ्याने खुर्ची पाडत कार्यालयात घोषणाबाजी करत निषेध केला. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अजय फटांगरे उपस्थित होते.

Sangamner Drought Declaration
Pathardi Sand Theft: पाथर्डीत शासकीय वाळू चोरीचा पर्दाफाश; जेसीबी, डंपरसह ४०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी येत नाहीत हे पाहून डॉ. जयश्री थोरात चांगल्याच संतापल्या. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी येत नाही, यावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, महावितरणाचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व शेतकरी व युवकांना शांत केले व त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरती सर्व पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेतकरी मागे हटायला तयार नाही हे पाहून प्रशासनाने भूमिका बदलत प्रांताधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासकीय भावनमध्ये आले. यानंतर मोर्चाच्या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरत जाब विचारला.

Sangamner Drought Declaration
Ahilyanagar DJ Ban: डीजेवरील सरसकट बंदीऐवजी नियमांचे बंधन घाला; साऊंड व्यावसायिकांचे उपोषण सुरूच

संगमनेर तालुक्यात दुष्काळी जाहीर करण्याच्या मागण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी काल मंगळवारी (दि.२२) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर जळालेली पिके घेऊन मोर्चात सहभागी होवून रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी सरकार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. संगमनेर शहरातील यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय झालेल्या मोर्चात माजी आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, ॲड. माधवराव कानवडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शरद नाना थोरात, आर. एम. कातोरे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Sangamner Drought Declaration
Sangamner Drugs Case: ‘एमडी’ प्रकरणाची चौकशी; पोलिसांवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप

यशोधन कार्यालय येथून बाजार समिती, बस स्थानक, मार्गे नविन नगर रोड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी थोरात म्हणाले, खोटी माहिती देवून आशेला लावायचे काम सरकार करत आहे. दुसऱ्या विषयाकडे जनतेचे लक्ष वळून दिशाभूल करायची. सध्या असा उद्योग सुरू असून खोट्या घोषणा नको, तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. सर्वत्र पिके वाया गेली आहे. पंचनामे कसले करता, राज्यात कुठे पाऊस नाही. त्यामुळे सर्वांना मदत करा. विद्यमान लोकप्रतिनीधी यांना पाण्याची लढाई माहित नाही. हक्काच्या ३० टक्के पाण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्व. पिचड आणि आम्ही लढलो आणि म्हणून पाणी मिळाले. त्यावेळी पूर्वीचे पाट रुंद केल्यामुळे पुन्हा पाणी पूर्वेकडे वाहून जात होते. त्यामुळे पुन्हा न्यायालयीन लढाई करून आवर्तन काळामध्ये ११ तास हक्काची वीज मंजूर करून घेतली. शेतकऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुराचा सुद्धा विचार केला पाहिजे. कोणतीही दिरंगाई न करता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठी मदत करा. तालुक्याला हक्काचे पाणी व वीज मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Sangamner Drought Declaration
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा; यशवंतराव गडाखांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

यावेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कार्याध्यक्ष अमोल शेरकर, रामहरी कातोरे, किसनराव पानसरे, कोमल उगले, भाऊराव रहाणे, प्रियांका गडगे, संदीप थिटमे, कल्याणी राहणे यांनीही सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वेळीच जागे व्हा

यावर्षी १९७२ पेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसावर आधारित संपूर्ण शेती उद्‌ध्वस्त झाली आहे. मात्र सरकार घोषणाच्या बाहेर पडायला तयार नाही. त्यामुळे विज जाते म्हणजे फक्त वीज जात नाही. तर पाणी पुढे जाते. पाणी पुढे गेले तर संपूर्ण जीवन आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल म्हणून वेळीच जागे व्हा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news