Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा; यशवंतराव गडाखांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

दुष्काळसदृश परिस्थितीत राजकीय प्रतिष्ठेपेक्षा शेतकरी आणि बँकेच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्याची भूमिका
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on
Updated on

नगर / सोनई: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता आर्थिक हिताचा विचार करण्याची गरज आहे. बँकेची आगामी निवडणूक प्रतिष्ठेची न करता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले आहे.

Ahilyanagar District Bank
Sugarcane Workers Strike: ऊसतोड कामगारांचा राज्यव्यापी संपाचा इशारा; नव्या कराराशिवाय गळीत हंगाम रोखणार

यंदाच्या पावसाळ्यात अल निनोचा परिणाम जाणवू लागल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. अशा गंभीर परिस्थितीत राजकीय प्रतिष्ठा न करता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन बिनविरोध करावी, असे आवाहन गडाख पाटील यांनी केले.

Ahilyanagar District Bank
Shrigonda Police Staff Transfer: श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना वाद भोवला; दोघांची बदली

शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, महिला बचत गट तसेच विविध सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण जिल्हा बँकेशी जोडलेले असल्याने निवडणुकीकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता तिच्या आर्थिक हिताचा विचार करण्याची गरज असल्याचे गडाख पाटील यांनी म्हटले.

सात वर्षे चेअरमन, ३१ वर्षे संचालक

यशवंतराव गडाख हे १९९१ ते २०२१ या कालावधीत ३१ वर्षे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते. १९९३ ते १९९५ आणि १९९९ ते २००५ या कालावधीत सात वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. बँकेचे कामकाज, आर्थिक व्यवहार तसेच शेतकरी सभासदांच्या प्रश्नांचा अनुभव असलेल्या गडाख पाटील यांच्या आवाहनाला सर्वपक्षीय नेते काय व कसा प्रतिसाद देतात, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सात वर्षे चेअरमन, ३१ वर्षे संचालक

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar ZP School Fund: जि.प.च्या १२५ शाळा खोल्यांचा १६ कोटींचा निधी अखर्चित; दायित्वाचा प्रश्न ऐरणीवर

यशवंतराव गडाख हे १९९१ ते २०२१ या कालावधीत ३१ वर्षे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते. १९९३ ते १९९५ आणि १९९९ ते २००५ या कालावधीत सात वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. बँकेचे कामकाज, आर्थिक व्यवहार तसेच शेतकरी सभासदांच्या प्रश्नांचा अनुभव असलेल्या गडाख पाटील यांच्या आवाहनाला सर्वपक्षीय नेते काय व कसा प्रतिसाद देतात, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भेटीगाठी अन्‌ गडाखांचे आवाहन..

जिल्हा बँकेसाठी राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठोपाठमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशवंतराव गडाखांची भेट घेतली होती. ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात-गडाख हे एकमेकांचे जवळचे स्नेही आहेत. गडाखांनी बिनविरोधाचे केलेले आवाहन म्हणजे बँकेच्या राजकारणात सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते थोरात, मंत्री विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांच्या एकीच्या दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जाते. त्यामुळे बँक निवडणूक बिनविरोधाच्या दिशेने वाटचाल करेल, असे संकेत यातून दिले गेले आहेत. नेत्यांनी गडाखांची घेतलेली भेट अन्‌ त्यानंतर केलेले आवाहन पाहता बिनविरोधाचे पाऊल पडल्याचे मानले जाते.

Ahilyanagar District Bank
Pathardi Police Bribe Case: गंभीर गुन्ह्याची कलमे सौम्य करण्यासाठी लाच; पाथर्डी पोलिस शिपाई एक लाख घेताना रंगेहाथ

गडाख उवाच..

पावसाअभावी खरीप पिके संकटात असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू पाहते आहे. अशा गंभीर परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. बँक निवडणूक लढविण्याचा आणि प्रचारात वेळ खर्च करण्याऐवजी तो दुष्काळसदृश परिस्थितीने त्रस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वापरावा.

बँक निवडणूक प्रक्रिया राबविताना मोठा खर्च होतो. दुष्काळसदृश परिस्थितीत हा अनाठायी खर्च टाळून बँकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे गरजेचे आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास निवडणुकीवरील खर्च वाचण्याबरोबरच बँकेच्या कामकाजात सातत्य राखण्यास मदत होईल

यशवंतराव गडाख, ज्येष्ठ नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news