Pathardi Sand Theft: पाथर्डीत शासकीय वाळू चोरीचा पर्दाफाश; जेसीबी, डंपरसह ४०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

बोरुडे मळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; जेसीबी चालक ताब्यात, एक संशयित फरार
Pathardi Sand Theft
Pathardi Sand TheftPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: शहरातील बोरुडे मळा परिसरात शासकीय वाळूची विनापरवाना चोरी करून वाहतूक करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत जेसीबी, डंपर आणि चार ब्रास शासकीय वाळू असा एकूण ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pathardi Sand Theft
Ahilyanagar DJ Ban: डीजेवरील सरसकट बंदीऐवजी नियमांचे बंधन घाला; साऊंड व्यावसायिकांचे उपोषण सुरूच

या प्रकरणी उमेश विष्णू कचरे (वय २२, रा. पाडळी, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील नारायण बोरुडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बोरुडे मळा) फरार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Pathardi Sand Theft
Sangamner Drugs Case: ‘एमडी’ प्रकरणाची चौकशी; पोलिसांवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सतीश भवर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी (दि. २०) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण गांगुर्डे, पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव, अमोल कोतकर हे अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाईसाठी गस्त घालत होते. या वेळी गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बोरुडे मळा येथे नारायण बोरुडे हा जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये शासकीय वाळू भरून तिची विनापरवाना वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह बोरुडे मळा परिसरात जाऊन पाहणी केली.

Pathardi Sand Theft
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा; यशवंतराव गडाखांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

पोलिसांना बोरुडे यांच्या घरासमोर जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे दिसून आले. या वेळी जेसीबी चालक उमेश कचरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जेसीबी व डंपर हे नारायण बोरुडे यांच्या मालकीचे असल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाहनांची तपासणी केली असता डंपरमध्ये अंदाजे चार ब्रास शासकीय वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचेही तपासणीत समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Pathardi Sand Theft
Sugarcane Workers Strike: ऊसतोड कामगारांचा राज्यव्यापी संपाचा इशारा; नव्या कराराशिवाय गळीत हंगाम रोखणार

या कारवाईत २५ लाखांचा जेसीबी, १५ लाखांचा डंपर आणि ४० हजारांची अंदाजे चार ब्रास शासकीय वाळू असा एकूण ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उमेश विष्णू कचरे आणि नारायण बोरुडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news