Sagar Beg Anticipatory Bail: अत्याचार आणि पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा आरोप; सागर बेगचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पिस्तूल अद्याप हस्तगत नाही; आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
Law
LawPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: अत्याचार आणि पिस्तुलाचा धाक दाखविल्याच्या गंभीर आरोप प्रकरणी सागर बेगचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांनी फेटाळला. बेगविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ४९, ३५२ तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.

Law
Sangamner Drought Declaration: संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

पीडित महिलेने सुरुवातीला आईसह शिर्डी पोलिस ठाण्यात शून्य नंबरने एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर तो श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. फिर्यादीनुसार, सहआरोपी बाबू साळवे हा महिलेला वारंवार धमकावत होता. आरोपी सागर बेग व अन्य सहआरोपीच्या नावाने धमकी देत तिच्यावर दबाव आणला जात होता. एका प्रसंगी बाबू साळवेच्या खोलीत सागर बेग व सोनू बेग उपस्थित असताना तिघांकडे पिस्तूल असल्याचे सांगत महिलेला सहआरोपीसोबत संबंध ठेवण्यास धमकावल्याचा आरोप आहे.

Law
Pathardi Sand Theft: पाथर्डीत शासकीय वाळू चोरीचा पर्दाफाश; जेसीबी, डंपरसह ४०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

सरकारपक्षाचा युक्तिवाद मांडताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एन. आर. कहाणे यांनी आरोप गंभीर स्वरूपाचे असून गुन्ह्यास किमान २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपीचे गंभीर गुन्हेगारी पूर्वचरित्र असून, अटकपूर्व जामीन मिळाल्यास फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची अथवा त्यांच्याशी छेडछाड करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. कथित गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल अद्याप हस्तगत झालेले नसल्याने आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Law
Ahilyanagar DJ Ban: डीजेवरील सरसकट बंदीऐवजी नियमांचे बंधन घाला; साऊंड व्यावसायिकांचे उपोषण सुरूच

...म्हणून कोठडीतील चौकशी आवश्यक!

न्यायालयाने उपलब्ध नोंदी, फिर्यादी महिलेच्या आईचा जबाब, पोलिसांचे म्हणणे आणि व्हिडिओचा संदर्भ विचारात घेतला. आरोपीच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्यावर २५ गुन्हेगारी प्रकरणांची नोंद असल्याचेही आदेशात नमूद आहे. कथित पिस्तुलाची अद्याप जप्ती झालेली नसून आरोपीने तपासात सहकार्य केले नसल्याने कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून २९ ऑगस्टचा अंतरिम जामीन आदेश रद्द करण्यात आला.

Law
Sangamner Drugs Case: ‘एमडी’ प्रकरणाची चौकशी; पोलिसांवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप

पीडितेचे प्रतिज्ञापत्राद्वारे घूमजाव! पण..

दरम्यान, आरोपीने धमकावले नसल्याचे तसेच एफआयआर दाखल करण्यासाठी आपल्यावर मानसिक दबाव आणल्याचे फिर्यादी महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले होते. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला. एफआयआर दाखल करताना त्यातील मजकूर महिलेला वाचून दाखविण्यात आला असून, तिने तो बरोबर असल्याचे मान्य केले, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news