Ram Shinde District Bank Election: विखे, गडाख, थोरात एकत्र आले; मला बाजूला ठेवण्याचे प्रयत्न झाले, राम शिंदेंचा गौप्यस्फोट

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सभापती प्रा. राम शिंदे यांचे वक्तव्य; गनिमी काव्याची रणनीती वापरून योग्य वेळी निर्णय घेतल्याचे स्पष्ट
Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District Bank ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

जामखेड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त जिल्ह्यात फिरून सर्व प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या निवडणुकीत विखे, गडाख आणि थोरात यांच्यासारखे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधकही एकत्र आले. मला बाजूला ठेवण्याचे प्रयत्न झाले, विविध स्तरांतून टीका झाली; मात्र प्रतिकूल परिस्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची रणनीती लक्षात ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

Ahilyanagar District Bank Election
Vivek Kolhe Lok Samvad: आ. विवेक कोल्हे यांच्या लोकसंवादाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध नवनिर्वाचित झालेले सचिन घुमरे यांच्या सत्कार व पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात होते. या वेळी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवक, तालुक्यातील विविध सोसायट्यांचे चेअरमन व व्हाईस चेअरमन, सोसायट्यांचे ठरावधारक, विविध संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे सभापती व उपसभापती, पंचायत समितीचे सभापती व सदस्य आदी उपस्थित होते. या वेळी प्रा. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका कायम राहिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपल्या भूमिकेपासून विचलित न होता योग्य वेळी योग्य निर्णय घेतले.

Ahilyanagar District Bank Election
Shevgaon Paithan Road Accident: दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तीन युवकांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; खानापूरवर शोककळा

जिल्हा बँकेतील संचालकपद हे केवळ पद नसून शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आहे. राजकारणात टीका होत असते; मात्र त्यापलीकडे जाऊन कार्यकर्त्यांशी असलेली नाळ जपणे आणि दिलेल्या शब्दाला जागणे महत्त्वाचे असते. आता निवडणुकीतील मतभेद बाजूला ठेवून आगामी पाच वर्षांत शेतकऱ्यांना सुलभ पीककर्ज उपलब्ध करून देणे, विविध सोसायट्यांचे सक्षमीकरण करणे आणि सहकारी संस्थांना आर्थिक बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, तिच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Ahilyanagar District Bank Election
Nagar Dam Water Storage: नगर जिल्ह्यातील धरणांत ६७ टक्के पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता वाढली

या वेळी नवनिर्वाचित संचालक घुमरे यांनी, सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासह विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे, सहकारी संस्थांचे प्रश्न सोडविणे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. संचालकपदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

Ahilyanagar District Bank Election
Radhakrishna Vikhe Patil Diwali: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्र्यांची दिवाळी; विखे पाटलांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद

जिल्हा बँकेत माझीही एंट्री!

आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडली. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांना जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व मिळवून देण्यात यश आले. त्यामुळे जिल्हा बँकेत माझीही एन्ट्री झाली असून, माझ्यामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षांची राजकीय कटुता कमी होण्यास हातभार लागला आहे. या कामाचे पुण्यही आपल्याला मिळेल, असे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.