Government Relief: शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!

राहुरीतील 54 हजार शेतकऱ्यांना 107 कोटींची मदत; शासनाच्या निर्णयाने दिवाळीपूर्वी उजेड पसरला!
शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!Pudhari
Published on
Updated on

रियाज देशमुख

राहुरी: गेल्या महिनाभरापूर्वी राहुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेले कापूस, सोयाबीन, मका, कांदा, तूर, भाजीपाला आणि फळबागांचे हिरवे स्वप्न पाण्यात वाहून गेले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शासनाने मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. मदतीचा निर्णय होताच शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारल्याने बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. (Latest Ahilyanagar News)

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Karjat Election: ‘वंचित‌’ कर्जतमध्ये सर्व जागा लढवणार!

राहुरी तालुक्यातील 53 हजार 810 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अंतिम अहवाल शासनाने स्वीकारला आहे. तहसीलदार नामदेव पाटील, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे आणि गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी आणि पंचायत समिती प्रशासनाने दिवसरात्र मेहनत घेत नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण केले. तालुक्यातील एकूण 42 हजार 142 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Shingnapur Devasthan: शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांना दिलासा; सप्टेंबरचा पगार झाला, बोनस मात्र अडकला!

त्यात कापूस 25,012 हेक्टर, सोयाबीन 8,683 हेक्टर, कांदा 3,100 हेक्टर, मका 2,071 हेक्टर, तूर 310 हेक्टर, फळबागा 1,020 हेक्टर, भाजीपाला 82 हेक्टर आणि इतर पीके जवळपास 5 हजार हेक्टर क्षेत्रावर बाधित झाली. या नुकसानीचा एकूण 107 कोटी रुपयांचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यात अतिवृष्टीमुळे बाधितांना 65 कोटी व रब्बी हंगामासाठी 42 कोटींचा निधी प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने कोणत्याही क्षणी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Sangamner Diwali: संगमनेरकरांची १५० कोटींची दिवाळी; जल्लोष अन्‌ आनंदोत्सवाने फुलली बाजारपेठ!

दरम्यान, अतिवृष्टीने शेतकऱ्यांची सर्वाधिक नुकसान झाले. सर्वत्र पाणीमय परिस्थिती झाल्यानंतर हातातोंडाशी आलेल्या कापूस पीकालाही दर मिळेनात. साठवणुकीचा खर्च होऊनही कांदा कवडीमोल झाला.

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Diwali: अभ्यंगस्नान, फराळ अन्‌ रोषणाईचा झगमगाट; आज लक्ष्मीपूजन, पूजेच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

एकीकडे अतिवृष्टीने दिवाळ सण अंधारात असताना दुसरीकडे कापसाच्या दराच्या वातेला ओलावा लागला. परिणामी दर कोसळलेला कापूस व कांदा पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. परंतु शासनाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांची मदत जाहिर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अपेक्षित रक्कम जमा होईल अशी अपेक्षा लागलेली आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Late MLA Shivaji Kardile Tribute: जेऊर गाव बंद ठेवून स्व. आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली

दिवाळीची खरी गोडी शासनाच्या मदतीत: मोरे

राहुरी शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठेत नवसंजीवनी आणली आहे. दीर्घकाळ ओलसर मनाने जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आशेचा उजेड दिसू लागला आहे. दिवाळीपूर्वी हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा एकदा प्रकाश फुलणार आहे. या दिवाळीत खरी गोडी गुळात नव्हे, तर शासनाच्या दिलाशात आहे, अशी भावना सेना शिंदे गटाचे शेतकरी नेते रविंद्र मोरे यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Gold-Silver Rates : सुवर्ण सीमोल्लंघन, चांदीलाही झळाळी

जनतेची काळजी घेणारे युती शासन: गाडे

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती शासनाने प्रत्येक वेळी आपली जबाबदारी पार पाडली आहे. जनतेला नेहमीच संकटात मदत करणार्या युती शासनाने शेतकर्यांना दिवाळी सणाला भेट देत नुकसानीचा निधी देण्याचा निर्णय घेतला. युती शासनामुळे शेतकर्यांना दिवाळी सणाला सहकार्य होणार असल्याचे राहुरी तालुका मंडल प्रमुख युवराज गाडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!
Gold-Silver Price : 'लक्ष्मी'च्या पावलांनी सुवर्ण, रूपेरी स्वस्ताई

कर्जमाफीचा शब्द पाळणे गरजेचे: सागर तनपुरे

महायुती शासनाने अनेक फसव्या घोषणा करून सत्ता मिळवली. शेतकर्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविले. दिवाळी सणापूर्वीच नुकसानग्रस्तांचा निधी जमा होणे महत्वाचे होते. राज्यात नैराश्याच्या गर्तेत असलेल्या शेतकर्यांना तुटपुंजी मदत देऊन जाहिरातबाजी करणार्या युती शासनाने कर्जमाफीची घोषणा करून शेतकर्यांचे अश्रृ पुसावे अशी मागणी राहुरीचे माजी नगरसेवक तथा केशरबाई उद्योगसमुहाचे सागर तनपुरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news