Gold-Silver Rates : सुवर्ण सीमोल्लंघन, चांदीलाही झळाळी

सोने १ लाख २२ हजारांवर, चांदी दीड लाखावर
Gold Rate Today
Gold-Silver Rates : सुवर्ण सीमोल्लंघन, चांदीलाही झळाळी File Photo
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Gold-Silver Rates

छत्रपती संभाजीनगर: साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसरा सणाच्या पूर्वसंध्येला सोन्या-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली.

Gold Rate Today
Bogus Birth Certificates : एसडीओंकडून 1325 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप

जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर आता १ लाख २२ हजार ३५० प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला. गेल्या काही सोन्या-चांदीचे दर सातत्याने नवनवीन उच्चांक गाठत आहे. मार्च २०२५ मध्ये जवळपास ८९ हजाराच्या आसपास असलेले सोने सात महिन्यात तब्बल ३३ हजाराने उसळी घेते ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याने तब्बल १ लाख २२ हजार ३५० चा नवा उच्चांक गाठला.

छत्रपती संभाजीनगर येथील सराफा व्यापारी नंदकुमार जालनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.१ ऑक्टोबर), १,५०० रुपयांच्या मोठ्या वाढीसह २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर आता १,२२,३५० वर पोहचला.

Gold Rate Today
Siddharth Udyan : सिद्धार्थ उद्यानात 14 वर्षांनंतर पुन्हा सिंहगर्जना

गतवर्षी दसऱ्याला सोन्याचा दर ७८ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यात एक वर्षात तब्बल ४३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर, चांदी दरानेही पुन्हा विक्रमी झेप घेतली आहे. एका दिवसात चांदी ३,८०० रुपयांच्या वाढीसह १ लाख ५३, २५० प्रतिकिलो या नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. गतवर्षी दसऱ्याला चांदीचा दर ८०,००० रुपये प्रतिकिलो होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news