Gold-Silver Price : 'लक्ष्मी'च्या पावलांनी सुवर्ण, रूपेरी स्वस्ताई

लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी झुंबड, शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स ४११, निफ्टीत १३३ अंकांनी वाढ
Gold-Silver Price
Gold-Silver Price : 'लक्ष्मी'च्या पावलांनी सुवर्ण, रूपेरी स्वस्ताईFile Photo
Published on
Updated on

Diwali Lakshmi Puja Gold-Silver Price

छत्रपती संभाजीनगर/जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. सोने दहा ग्रॅममागे सरासरी ७२१ रुपयांनी, तर चांदी किलोमागे ५१५० रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. सोबतच शेअर बाजारातही दोन्ही निर्देशांक वधारल्यामुळे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स ४११ आणि निफ्टीत १३३ अंकांनी वाढ झाली आहे.

Gold-Silver Price
Diwali Faral Selling : उमेदच्या महिलांची दिवाळी फराळ विक्रीतून १० लाखांहून अधिक कमाई

शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी २७८१ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३२ हजार ३५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. लक्ष्मीपूजनाच्या आधी सोमवारी सकाळी पुन्हा बाजार उघडताच ७२१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख ३१ हजार ६३४ रुपयांपर्यंत घसरले. धनत्रयोदशीच्या दिवशी ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ७५ हजार रुपयांपर्यंत खाली आले होते.

पाठोपाठ सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदी एक लाख ६९ हजार ९५० रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. शेअर बाजारात दीपोत्सव बँका, आयटी, ऑईल अँड गॅस निर्देशांकात वाढ झाल्याने सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर निर्देशांकात वाढ झाली. विदेशी संस्थांसह देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची आतषबाजी केल्याने शेअर निर्देशांकात सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सोमवारच्या (दि. २०) सत्रात सेन्सेक्स ४११ आणि निफ्टीत १३३ अंकांनी वाढ झाली आहे.

Gold-Silver Price
Sambhajinagar News : श्रद्धेच्या निकषावर महाविहार बौद्धांच्या हवाली करा : भीमराव आंबेडकर

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स ०.४९ टक्क्याने वाढून ८४,३६३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक ०.५२ टक्क्याने वाढून २५,८४३ अंकांवर स्थिरावला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.७५ टक्क्याने आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ०.४६ टक्क्याने वधारला. निफ्टी पीएसयू बैंक निर्देशांकाने सर्वाधिक २.८७ टक्क्यांनी उसळी घेतली. निफ्टी ऑटो निर्देशांक ०.१६ टक्क्याने घसरला.

संभाजीनगरात किंचितशी वाढ

छत्रपती संभाजीनगरात सोमवारी सोन्याचा भाव १,३२,५०० तोळा एवढा होता. चांदी १,८०,००० किलो असा होता. संध्याकाळी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्याने सांगितले. दुपारी सोने १,३०,४०० असे होते. धनत्रयोदिशीच्या तुलनेने विचार केल्यास भावात चढ-उतार होता. असे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

आज मुहूर्त ट्रेडिंग

लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजाराला मंगळवारी (२१ ऑक्टोबर) आणि बुधवारी सुट्टी असून लक्ष्मीपूजनानिमित्त दुपारी १ वाजून ४५ मिनिट ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत चालेल. प्री-ओपनिंग व्यवहार दुपारी दीड ते पावणेदोन या वेळेत होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news