

सोनई: श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. यातच देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचा पगार अडकला असल्याने कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत होते. आजच पगार झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. (Latest Ahilyanagar News)
राज्य सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने 10 नोव्हेंबर पर्यंत ‘जैसे थे’ आदेश दिला. कार्यालयीन अधिकार कार्यकारी समिती व बँकेतील व्यवहारावर सह्मांचे अधिकार विश्वस्ताकडे.
त्यामुळे सप्टेंबरचा पगार कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. त्यात कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यतेने सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कार्यकारी समितीने यातून मार्ग काढून फक्त सप्टेबरचाच पगार केला असल्याचे समजते. बोनसला मात्र यावर्षी मुकावे लागण्याची वेळ आली आहे. शनिजयंती, शनिअमावस्या तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी वर्षातून अनेकवेळा 12 तास काम करावं लागते.
या कामाच्या मोबदल्यात देवस्थानकडून दरवर्षी पगाराच्या दीडपट बोनस मिळत असतो. पण आता न्यायालयीन प्रक्रियेत देवस्थान अडकले असल्याने निदान दिवाळीला पगार झाल्याने कर्मचाऱ्यांची थोड्याफार प्रमाणात दिवाळी होईल.