Rahuri Fake Milk Racket: राहुरीतील बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश; 31 नावे समोर

कृत्रिम क्रीमपासून 20 पट दूध निर्मिती; तपासावर प्रश्नचिन्ह, अधिवेशनात मुद्दा गाजण्याची शक्यता
Fake Milk
Fake MilkPudhari
Published on
Updated on

रियाज देशमुख

राहुरी: सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. कृत्रिम क्रीम तयार करून त्यातून तब्बल 20 पट दूध बनविणारा मूळ सूत्रधार राहुरीतील समीर शेख असल्याचे दिसले. तपासात 31 नावे पुढे आली. मात्र, त्यांच्यावर काय कारवाई झाली, त्यांनी हे रसायन कधीपासून खरेदी केले, त्यांचे दूध कोणत्या प्लॅन्टला, कोणत्या शहरात विक्रीसाठी जात होते, याचा तपास मात्र थंडावल्याचे चित्र आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. भेसळीचे हे प्रकरण अधिवेशनात गाजणार असल्याचे समजते.

Fake Milk
Shrirampur Land Fraud Case: उंदिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने 14 फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे धडक कारवाई करत रॅकेटचा पर्दाफाश केला. पॅराफिन (मिनरल ऑईल), ‌‘9.5‌’ नावाचे रासायनिक द्रव्य, मिल्क क्रीम आणि पाणी यांचे मशीनद्वारे मिश्रण करून कृत्रिम क्रीम तयार केली जात होती.

Fake Milk
Shirdi Devotee Fraud Action: शिर्डीत भाविकांची अडवणूक बंद; फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

या एका लिटर क्रीमपासून तब्बल 20 लिटरपर्यंत बनावट दूध तयार करून ते विविध भागात विकले जात होते. या रॅकेटचे धागेदोरे थेट राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरापर्यंत पोहोचले. येथील एका गोडाऊनमध्ये हे घातक क्रीम तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले. येथून तयार होणारी क्रीम राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तसेच बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पुरवली जात होती.

Fake Milk
Shevgaon Illegal Murum Case: बेकायदा मुरूम डंपर पलटी; महसूल सेवक गंभीर जखमी

या प्रकरणात समीर शेख हे नाव पुढे आले. त्यानंतर ही साखळी 33 लोकापर्यंत पोहचली. या लोकांनी कृत्रिम दूधासाठी संबंधित रसायन खरेदी केल्याचे किंबहुना वापरल्याचे तपासातून पुढे आले. संबंधितांची यादीही माध्यमांमध्ये फिरली. याशिवाय अन्य काही नावेही समोर आल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगितले जाते. मात्र, या प्रकरणात किती संशयितांना अटक करण्यात आली, याची कोणती माहिती पुढे आलेली नाही. याबाबत नगरचे एलसीबीचे तपासी पथक तोंडावर बोट ठेवून आहे. त्यामुळे हा तपास कुठंतरी थंडावला आहे का, असा प्रश्न पुढे येत आहे.

Fake Milk
Deulgaon Siddhi Murder Case: देऊळगाव सिद्धीतील मृत्यू नव्हे तर खून; एलसीबी तपासात धक्कादायक उघड

दरम्यान, देवळाली प्रवरा येथील संशयित गोडाऊनवर छापा टाकला असता, पुरावे नष्ट करण्यासाठी मशीन हलविल्याचा संशय व्यक्त होत आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासाला अपेक्षित गती नसल्याने हे प्रकरण अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news