Abhishek Kalamkar Case: माजी महापौर अभिषेक कळमकरविरोधात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Abhishek Kalamkar rape case
Abhishek Kalamkar rape casePudhari
Published on
Updated on

नगर: माजी महापौर अभिषेक कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून पाण्यात गुुंगीचे औषध पाजून 27 वर्षीय युवतीवर मोटारकारमध्ये अत्याचार केल्याचा आणखी एक गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना जुलै 2024 मध्ये पाथर्डी रस्त्यावरील नगर क्लबजवळ घडल्याचे आणि नंतर तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Abhishek Kalamkar rape case
Ahilyanagar Encroachment Removal Drive: कापड बाजारातील अतिक्रमणांवर कारवाई; वाहतुकीला दिलासा

मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीडित युवतीची ओळख अभिषेक कळमकरशी झाली होती. अभिषेकने तिला ‌‘तू काय काम करते?‌’ असे विचारले. त्यावर तिने बेरोजगार असल्याचे सांगितले. त्याने तिला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन देत तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर जुलै 2024 मध्ये त्याने युवतीशी संपर्क साधून शोरूममध्ये काम देण्याच्या बहाण्याने बेलेश्वर मंदिर परिसरात पाथर्डी रस्त्यावर बोलावून घेतले. पीडिता तिथे पोहोचल्यानंतर कळमकर याने तिला कारमध्ये बसवले. नगर क्लबच्या पुढे निर्जन ठिकाणी कार उभी करून त्याने तिला पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली. पाणी प्याल्यानंतर पीडितेला ग्लानी आली असता कारमध्येच अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला धमकी देऊन सोडून दिले.

Abhishek Kalamkar rape case
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचे नवे कारनामे उघड; २० कोटींचे व्यवहार तपासात

दोन ते तीन दिवसांनी पुन्हा कळमकर याने पीडितेला फोन करून भेटीची मागणी केली. तिने नकार दिला असता, त्याने कारमधील घटनेचे छायाचित्र आणि चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. भेटायला न आल्यास जीवे मारण्याचीही भीती घातली. सामाजिक दबावामुळे व भीतीपोटी पीडितेने इतके दिवस मौन पाळले होते. मात्र, आरोपीवर इतरही गुन्हे दाखल झाल्याचे समजताच पीडितेने हिंमत करून पोलिसांत धाव घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Abhishek Kalamkar rape case
Rahuri Assembly Bypoll Candidates: राहुरी पोटनिवडणूक: 7 अर्ज बाद, 22 उमेदवार रिंगणात

कळमकर पोलिसांना सापडेना

माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात यापूर्वी अत्याचाराचा एक गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिस करीत आहेत. मात्र, अद्याप कळमकर पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्याला पकडले. मात्र, मुख्य आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आता गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला आहे. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला स्टँडिंग वारंटही काढले आहे.

Abhishek Kalamkar rape case
Sangamner Hospital Negligence: संगमनेरमध्ये उपचारातील हलगर्जीपणा; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा

परदेशी पळण्याच्या वाटा बंद

आरोपी अभिषेक कळमकर परदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, कळमकर याने पासपोर्टचे नूतनीकरण केलेले नसल्याने परदेशी पळण्याची त्याची वाट बंद झाली आहे. मात्र, बनावट पासपोर्ट काढून तो पळून जाऊ शकतो, अशी शंका पोलिसांना असल्याने त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news