Rahuri Assembly By-Election: राहुरी पोटनिवडणूक; ६७ नवीन मतदान केंद्रांची वाढ, ६ जानेवारीला प्रारूप मतदारयादी

मतदारसंख्या ३.३१ लाखांवर; १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार
Voter List
Voter List Pudhari
Published on
Updated on

नगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या वतीने सुरु झाली आहे. या मतदारसंघात आणखी 67 मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली असून, या वाढीस भारत निवडणूक आयोगाने मान्यतादेखील दिली आहे. मंगळवारी (दि.6) 3 लाख 31 हजार 364 मतदारसंख्या असलेली प्रारुप मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

Voter List
Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगर मनपा निवडणूक; दोन दिवसांत प्रचारासाठी ४९ परवानग्या

विधानसभा सदस्य कै. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या 223-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 नुसार या मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला केला.

Voter List
Samruddha Panchayat Raj Abhiyan: पाथर्डीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा बोजवारा

हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार मतदारसंघातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 29 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या मतदारसंघात 307 मतदान केंद्रांची संख्या होती.

Voter List
Zilla Parishad Sports Teacher: आता प्रत्येक केंद्राला एक क्रीडाशिक्षक; जिल्हा परिषद शाळांसाठी मोठा निर्णय

बाराशेपेक्षा अधिक मतदारसंख्या मतदान केंद्रांत नसावी यासाठी मतदान केद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात येऊन नवीन 67 मतदान केंद्र वाढविण्यात आले. त्यानुसार आगामी पोटनिवडणुकीसाठी आता 374 मतदान केंद्र असणार आहेत.

Voter List
Leopard terror in Rahuri: बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी थेट बंदूक घेऊन शेतात

दरम्यान, 6 जानेवारी 2026 रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 6 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news