

ढोरजळगाव : प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होऊन खेड्यांमध्ये डॉ. अब्दुल कलाम घडले पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तालुका गणित-विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन ढोरजळगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात शुक्रवारी पार पडले. यावेळी आ. राजळे म्हणाल्या, आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक आहेत. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून सामाजिक गरज ओळखून समाजाला उपयोग होईल यासारखी उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली पाहिजेत.
त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेच्या प्रमुख सुमती घाडगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी सध्या ए.आय. चे युग असून भविष्यात रोबोटीक्स च्या माध्यमातून स्मार्ट पिढी घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
या प्रसंगी तालुक्यातील शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी मान्यवरांनी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय रचना, सौर ऊर्जेचा वापर, पर्यावरणासंबंधी संदेश पर उपकरण, ग्रीन हाऊस, अशा वेगवेगळ्या उपकरणांचा समावेश होता. कार्यक्रमास बापूसाहेब पाटेकर, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, शेवगाव तालुका गणित विभागाचे अध्यक्ष नानासाहेब काटे, विज्ञान विभाग अध्यक्ष गोरक्षनाथ सोलाट, सचिव मुकुंद अंचावले, सरपंच अश्विनी कराड, जगन्नाथ होडशिळ, गणेश कराड , भाऊसाहेब कराड,अनंता उकिर्डे, महादेव पाटेकर, रमेश लांडे, मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे, सचिन कर्डिले, आशिष भारती, शिवाजीराव काटे, शहादेव वाकडे आदी. उपस्थित होते. प्रास्ताविक मुकुंद अंचवले यांनी, सूत्रसंचालन अशोक गाडे त्यांनी, तर आभार प्रा. संजय बुधवंत यांनी मानले.