Pathardi Police Scorpio Theft: पाथर्डीत पोलिस ठाण्यातून जप्त स्कार्पिओ चोरीला

अहिल्यानगर रोडवरील जुन्या ठाण्याच्या आवारातील घटना; सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळे
Pathardi Police Scorpio Theft
Police Scorpio TheftPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त केलेली स्कार्पिओ शहरातील जुन्या पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळे निर्माण झाल्याचे समजते.

Pathardi Police Scorpio Theft
Shrigonda Kolgaon Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात; भावी नवरदेवासह चौघांचा मृत्यू

सहाय्यक फौजदार देवीदास खैरे यांनी तक्रार दाखल केली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी खांडगाव शिवारात नाथभक्तांवरील लुटीचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी आरोपी शंकर चांगदेव वांढेकर याच्या ताब्यातून स्कार्पिओ (एमएच 16 डीएस 1070) ही जप्त केली होती. जप्त स्कॉर्पिओला नंबर प्लेट नव्हती. ही स्कॉर्पिओ अहिल्यानगर रोडवरील जुन्या पोलिस ठाण्याच्या आवारात उभी होती.

Pathardi Police Scorpio Theft
Ahilyanagar RTE 25 Percent Admission Rule: आरटीई २५% प्रवेशात १ किमी हवाई अंतराची अट; ग्रामीण पालकांत संताप

दरम्यान, नवनी पोलिस ठाण्यातून जुन्या पोलिस ठाण्यातील साहित्य हलविण्याचे काम सुरू असताना 15 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत स्कार्पिओ पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून सहाय्यक फौजदार रावसाहेब राठोड या घटनेचा तपास करीत आहेत.

Pathardi Police Scorpio Theft
Ahilyanagar Armed Robbery Case: अहिल्यानगर तालुक्यात सशस्त्र दरोडे; नारायणडोह-चिंचोडी पाटीलमध्ये दोन जखमी

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जुन्या पोलिस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील जप्त वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने उभी आहेत. मात्र तेथील फिरता कॅमेरा बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरी नेमकी कोणी केली, याचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातूनच जप्त वाहनाची चोरी झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

Pathardi Police Scorpio Theft
Shrigonda Kolgav Highway Accident: नगर–दौंड महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा मृत्यू

जुन्या ठिकाणी तातडीने नवीन कॅमेरा बसविण्यात येणार असून अतिरिक्त कॅमेऱ्याचीही व्यवस्था करण्यात येईल. सुरक्षा अधिक कडक करण्यात येईल.

विलास पुजारी, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news