Shrigonda Kolgav Highway Accident: नगर–दौंड महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा मृत्यू

कोळगाव शिवारात ट्रक-इकोची जोरदार धडक; १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
Shrigonda Kolgav Highway Accident
Shrigonda Kolgav Highway AccidentPudhari
Published on
Updated on

श्रीगोंदा: नगर - दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारात आज(२४)पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि मारुती इको या दोन वाहनांच्या भीषण अपघातात इको गाडीतील चालकासह इतर तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. इको गाडीचा चालक नितीन  कोकाटे रा. काष्टी वय २२, गजानन जनार्धन पायघन वय ४७, दुर्पा गजानन पायघन वय ३६,वैभव गजानन पायघन वय १९या  अशी मय तांची नावे आहेत. करण गजानन पायघन वय १३ हा मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Shrigonda Kolgav Highway Accident
Jal Jeevan Mission Proposal Approval: ५० लाखांपर्यंतच्या सुधारीत प्रस्तावांना विभागीय आयुक्तांची मान्यता

पायघन कुटुंबीय हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील मुळ राहणारे आहेत. कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात राहत होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. रात्रीच (२३) ते चिंभळे येथे जाण्यासाठी ते निघाले होते. कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात  त्यांची गाडी आल्यानंतर दौंड हून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. धडक एवढी जोराची होती की इको गाडीतील चौघांचा मृत्यू झाला.

Shrigonda Kolgav Highway Accident
Pathardi Robbery Gun Threat: पाथर्डीत गावठी कट्ट्याच्या धाकावर दुचाकी व रोकड लंपास; तिघे अटकेत

अपघाताची माहिती  समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, दादासाहेब क्षीरसागर यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढले.चारही जणांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news