Pathardi Dumper Threat Case: डंपरवरील कारवाईचा राग; मोटार वाहन निरीक्षकाच्या पतीला अडीच लाखांसाठी धमकी, सोन्याचे लॉकेट लुटले

चाकू गळ्याला लावून पिस्तूल रोखल्याचा आरोप; पत्नीची नोकरी घालवण्यासह दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी
Extortion News
Extortion NewsPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: डंपरवरील कारवाईच्या कारणावरून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महिलेच्या पतीला अडीच लाख रुपये देण्यासाठी धमकावून, पैसे न दिल्यास पत्नीची नोकरी घालविण्याची तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल रामदास गर्जे यांनी सुधीर शिरसाठ, किसन महादेव आव्हाड, भाऊ आरगडे, बबलू कांबळे, राहुल सानप यांच्यासह अनोळखी पाच ते सहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Extortion News
Kopargaon Stray Cattle: कोपरगावात मोकाट जनावरांचा दुसरा बळी; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गर्जे यांच्या पत्नी सोनाली या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहेत. २७ मार्च रोजी बोधेगाव येथे विनानंबरचा ओव्हरलोड डंपर आढळल्याने वायुवेग पथकाने कारवाई केली होती. हा डंपर सुधीर शिरसाठ यांचा असल्याचे सांगत त्यांनी कारवाई मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. २८ एप्रिल रोजी सुधीर शिरसाठ व किसन आव्हाड यांनी कारेगाव येथील पेट्रोल पंपावर गर्जे यांना बोलावून डंपरवरील कारवाईमुळे झालेल्या नुकसानीपोटी अडीच लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास त्रास देण्याची तसेच पत्नीची नोकरी घालविण्याची धमकी दिली.

Extortion News
Maharashtra Snakebite Notified Disease: महाराष्ट्रात सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ होणार? नागपंचमीच्या मुहूर्तावर निर्णयाची अपेक्षा

३ मे रोजी शिरसाठवाडी रोडवर गर्जे यांना अडवून मारहाण करण्यात आली. यावेळी धारदार हत्याराने डोक्यात वार करून जखमी केल्याचा आरोप असून, पोलिसांत तक्रार केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत गावठी पिस्तूल दाखवली. दरम्यान, ११ ऑगस्टच्या रात्री मित्रांसोबत खरवंडी येथे जेवण करून १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री गर्जे कारने घरी जात होते. जॉगिंग पार्कसमोर विनानंबरची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व अल्टो कार उभी होती. त्यातून संशयित खाली उतरून गर्जे यांची कार अडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Extortion News
Ahilyanagar Farmer Loan Waiver: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ६६ हजार शेतकऱ्यांसाठी ६२७ कोटींची कर्जमाफी; योजना वेगाने मार्गी

चाकू गळ्याला लावून पिस्तूल रोखले; दोन तोळ्यांचे लॉकेट लुटले. यावेळी अडीच लाख रुपये देण्याची मागणी करत ‘तुझी बायको कशी नोकरी करते ते आम्ही बघतो,’ अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने गर्जे यांच्या गळ्याला चाकू लावला, तर सुधीर शिरसाठ यांनी गावठी पिस्तूल रोखले.

Extortion News
Akari Padit Farmers Land: अकारी पडीत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; विखे पाटलांच्या आश्वासनानंतर सकारात्मक निर्णयाची आशा

त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास गर्जे व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन संशयित वाहने घेऊन निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news