Ahilyanagar Farmer Loan Waiver: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ६६ हजार शेतकऱ्यांसाठी ६२७ कोटींची कर्जमाफी; योजना वेगाने मार्गी

१ लाख ५ हजार २२८ कर्जदारांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण; अहिल्यानगर जिल्हा राज्यात अव्वल
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on
Updated on

नगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती मिळत आहे. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमध्ये १३६६ सोसायटीचे थकबाकीदार असलेल्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या कर्जापोटी बँकेकडे ६२७.४७ कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेच्या प्रशासक संगीता डोंगरे यांनी दिली.

Ahilyanagar District Bank
Akari Padit Farmers Land: अकारी पडीत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; विखे पाटलांच्या आश्वासनानंतर सकारात्मक निर्णयाची आशा

डोंगरे म्हणाल्या, शासनाकडून प्राप्त पहिल्या यादीमधील १ लाख १६ हजार ५१२ कर्जदार सभासदांपैकी १ लाख ५ हजार २२८ सभासदांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. ११ हजार २८४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण मृत, ॲग्रीस्टक फार्मर आयडी नसणे, परगावी, स्थलांतरित, बायोमॅट्रिक न होणे आदी कारणांमुळे बाकी आहे.

Ahilyanagar District Bank
Vruddheshwar Temple Parking: वृद्धेश्वर देवस्थानच्या पार्किंग जागेवरून वाद; पुजाऱ्यांकडून कंपाऊंडचा प्रयत्न?

ज्या शेतकरी सभासदांची प्रमाणीकरण प्रक्रिया होऊ शकेल अशा सर्वांची बँक व संस्थेमार्फत पाठपुरावा करून प्रमाणीकरण प्रक्रिया चालू आहे. पात्र सभासदांपैकी मृतांच्या कर्जखात्यांना वारस नोंद करण्याची प्रक्रिया वारसांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पातळीवर पूर्ण करून घेण्याची सूचना देण्यात आल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले.

Ahilyanagar District Bank
Pathardi Tiranga Rally: पाथर्डीत ३५० फुटी तिरंग्याची भव्य रॅली; शहर झाले तिरंगामय

दरम्यान, आधार प्रमाणीकरणात अहिल्यानगर अव्वल आहे. त्यासाठी मेहनत घेतलेले जिल्हयातील सर्व सचिव, त्यांची यंत्रणा आणि बँक कर्मचारी तसेच तालुका सहनिबंधक व लेखापरिक्षक यांचे बँकेचे प्रशासक डोंगरे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी कौतुक केले आहे. याकामी सहकार विभाग, जिल्हा लेखापरिक्षक कार्यालय तसेच जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news