Pathardi Robbery Gun Threat: पाथर्डीत गावठी कट्ट्याच्या धाकावर दुचाकी व रोकड लंपास; तिघे अटकेत

माणिकदौंडी चौक परिसरातील घटना; दोन अल्पवयीन आरोपी, दोन फरार
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मारहाण करत दुचाकी व रोकड रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक केली तर दोघे पसार झाले.

Gun
Kopargaon Caste Certificate Appeal: कोपरगाव उपनगराध्यक्षांवर बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप; पडताळणी समितीकडे अपील

अमिर हबिब शेख (रा. माणिकदौंडी चौक, पाथर्डी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. शेख हे फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय करतात. शेख यांची यमाहा लिबोरो (एमएच 16 डब्ल्यू 3319) दुचाकी घरासमोर उभी होती. सोमवारी (दि.22) मध्यरात्री ते फ्लेक्स लावण्यासाठी बाहेर आले त्यावेळी दुचाकीजवळ पाच अनोळखी उभे होते.

Gun
Akole Bonded Labour Case: अकोलेतील भोजदरी येथे वेठबिगारी प्रकरण; आठ मजुरांची सुटका

त्यातील तिघे दुचाकीची वायर तोडत होते. शेख यांनी जाब विचारताच दोघांनी मारहाण केली. एकाने कमरेला असलेला गावठी कट्टा काढून शेख यांच्या डोक्याला लावत ‌‘गप्प बसा, नाहीतर गोळी घालीन‌’, अशी धमकी दिली. इतरांनी खिशातील 650 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, डायरेक्ट दुचाकी पळवून नेली.

Gun
Rahuri Free Ration Scheme: राहुरीत अडीच हजार कुटुंबांचे मोफत धान्य बंद; करदात्यांवर शासनाची कारवाई

शेख यांनी आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबिय मदतीला धावले. त्याचवेळी दोघे पल्सर दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, नारायण बडे, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद, निलेश गुंड, संदीप बडे, संदीप नागरगोजे, भगवान गरगडे, प्रल्हाद निळे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली.

Gun
Ahilyanagar Water Scarcity Plan: अहिल्यानगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा कमी; २७० गावांना टँकरची गरज घटणार

अटक केलेल्यांपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत श्यामवेल शिंदे (रा.देहूरोड, पुणे) यास न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news