Parner Hospital Protest: पारनेर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पैसे मागितल्याचा आरोप; गांधीगिरी आंदोलन

पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नातेवाईकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या आरोपांवरून तीव्र आंदोलन. गांधीगिरी करून निषेध व्यक्त
Parner Hospital Protest
Parner Hospital ProtestPudhari
Published on
Updated on

पारनेर: पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी बुधवारी (दि. 27) राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Parner Hospital Protest
Tofkhana Crime Rise: तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली; अवैध धंद्यांवर रेड

शहरातील एका तरुणाने मंगळवारी (दि. 26) आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदनासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त तरुणांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडले.

Parner Hospital Protest
Andekar Gang Arrest: पुण्यातील आंदेकर टोळीच्या कोयता गँगला अहिल्यानगरमध्ये अटक; शस्त्रसाठा जप्त

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिस प्रशासनाचे पत्र आवश्यक असल्याचे, संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याचे, तसेच शवविच्छेदनासाठी आवश्यक मेडिकल किट नसल्याची कारणे पुढे करण्यात आली. अखेर कर्मचारी बोलावण्यासाठी वाहनखर्च व इतर रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मेडिकल किटच्या नावाखालीही पाच हजारांची मागणी करण्यात आल्याने उपस्थित तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली.

Parner Hospital Protest
Ahilyanagar MLC Election: अहिल्यानगर विधान परिषदेत पुन्हा रंगणार जगताप-ससाणे संघर्ष?

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी या प्रकारामागे ग्रामीण रुग्णालयातील कथित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखाचा गैरफायदा घेत आर्थिक लूट सुरू आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगरसेवक योगेश मते, डॉ. सचिन औटी, भूषण शेलार, सुभाष शिंदे, राजू शेख, विजय भास्कर औटी, तसेच शहराध्यक्ष वैभव औटी, विजय डोळ, राजेंद्र शेरकर, सतीश म्हस्के, राहुल बुगे, अक्षय औटी, किरण चौधरी, उत्कर्ष ठोकळ, अनिकेत साबळे, ऋतिक गायकवाड, शुभम जगताप, योगेश व्यवहारे, गणेश गजभिव, राहुल चौरे, शशीकांत औटी, जुनेद राजे, गौरव श्रीमंदीलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाची माहिती मिळताच खा. नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.

Parner Hospital Protest
Ahilyanagar ZP Fake Caste Certificate: बनावट जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात राहात्यातील शाखा अभियंत्यावर पदावनतीची कारवाई

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांनी स्वतः रुग्णालयात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. मात्र, डॉ. लोंढे यांनी फोनवरून चर्चा करत संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याने पारनेरला येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

खुर्चीला हार घालून आंदोलनकर्त्यांची गांधीगिरी

डॉ. लोंढे यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन केले. प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news