Parner ZP School Teacher Shortage: २०० विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षकच नाहीत! पारनेरच्या मांडवे खुर्दमध्ये आजपासून उपोषण

पदवीधर शिक्षक व कायमस्वरूपी मुख्याध्यापक पद रिक्त; पालक-ग्रामस्थांचा शिक्षण विभागाविरोधात एल्गार
Teachers
Teachers Pudhari
Published on
Updated on

पारनेर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत २००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असूनही शाळेत पदवीधर शिक्षक आणि कायमस्वरूपी मुख्याध्यापक ही दोन्ही पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने बुधवार (दि. २२)पासून मांडवे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालक व ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.

Teachers
Shrigonda Hotel Closure: श्रीगोंद्यात अनैतिक व्यापारावर मोठी कारवाई; दोन हॉटेले बंद करण्याचे आदेश

गेल्या काही वर्षांत ग्रामस्थ, पालक, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन शाळेला उत्कृष्ट भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय पुरस्कारानेही शाळा सन्मानित झाली आहे. मात्र, दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक शिक्षकच नसल्याने या सर्व विकासाला अर्थ राहिला नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Teachers
Nagar Taluka Gram Panchayat Elections: नगर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; दिवाळीपूर्वी गावोगावी रंगणार राजकीय रणधुमाळी

मार्च महिन्यापासून गटशिक्षणाधिकारी पवार यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. शाळेला तत्काळ एक पदवीधर शिक्षक आणि एक कायमस्वरूपी मुख्याध्यापक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Teachers
Ahilyanagar ZP Schools Classroom Shortage: अहिल्यानगर जिल्ह्यात 540 नवीन वर्गखोल्यांचा खोळंबा; 1,099 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

जोपर्यंत पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मांडवे खुर्द येथील सर्व ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news