Shrigonda Hotel Closure: श्रीगोंद्यात अनैतिक व्यापारावर मोठी कारवाई; दोन हॉटेले बंद करण्याचे आदेश

सुप्रिम व आम्रपाली लॉज अँड बारमध्ये देहव्यवसाय सुरू असल्याचा पोलिसांचा अहवाल; उपविभागीय अधिकाऱ्यांचे कठोर पाऊल
prostitution racket crime case
prostitution racket crime casePudhari
Published on
Updated on

श्रीगोंदा: तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिम व काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे पोलिस अहवालातून निदर्शनास आल्याने संबंधित या दोन्ही आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे.

prostitution racket crime case
Nagar Taluka Gram Panchayat Elections: नगर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; दिवाळीपूर्वी गावोगावी रंगणार राजकीय रणधुमाळी

श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी या कारवाईबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिममध्ये आसाम, गुजरात व महाराष्ट्रातील सात महिलांना पैशाचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. त्यांना हॉटेलमध्ये ठेवून पुरुष ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्यामार्फत देहव्यापार करण्यात येत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी हॉटेलचालक व मालक किरण रावसाहेब जरे आणि सुनील नाना पठारे यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

prostitution racket crime case
Ahilyanagar ZP Schools Classroom Shortage: अहिल्यानगर जिल्ह्यात 540 नवीन वर्गखोल्यांचा खोळंबा; 1,099 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. जागा भाडेकराराने दिली असून, तेथे अनैतिक व्यापारास परवानगी दिलेली नसल्याचा, तसेच आजारपणामुळे बाहेरगावी असल्याने या प्रकाराची माहिती नसल्याचा दावा हॉटेल मालकाने केला होता. सध्या हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी भोजनाची सुविधा असून, कारवाई झाल्यास कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केवळ गुन्हा दाखल झाल्याच्या आधारावर कारवाई करू नये, असा युक्तिवादही करण्यात आला होता.

prostitution racket crime case
Shirdi Crime: शिर्डीत व्यवसायाच्या वादातून फळविक्रेत्या महिलेची हत्या; दोन महिलांना अटक, सीसीटीव्हीत कैद झाली घटना

मात्र, पोलिस विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मूळ जमीन अथवा घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

prostitution racket crime case
Shrirampur Sonam Wangchuk Protest: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूरात निदर्शने; केंद्र सरकारविरोधात माले लिबरेशनचा एल्गार

अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली येथे मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश असून, रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते व किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्धही श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी व श्रीगोंदा पोलिस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. यासाठी १५ जून व १९ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, संबंधित सुनावणीस गैरहजर राहिले. पोलिस विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news