

अकोले: येथील वाशेरे शिवारातील एका दोडक्याच्या पिकात गांजाच्या झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन व जोपासना करताना अकोले पोलिसांना आढळली आहे. यावेळी अकोले पोलिसांनी १५ लाख ३६ हजारांचा गांजा जप्त करून गुन्हा दाखल करून वाटेकरी विजय रघुनाथ गजे (रा. वाशेरे) याला गजाआड केले आहे.
तर आरोपी विजय रघुनाथ गजे याला अकोले न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. एकाची वाशेरे शिवारात शेतजमीन असून, शेतजमिनीमध्ये वाटेकरी विजय रघुनाथ गजे याने दोडक्याचे पिक केलेले आहे.
त्या दोडक्याच्या पिकात गांजाच्या झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन व जोपासना केलेली आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस हवालदार रवींद्र वाकचौरे, पोलिस शिपाई अविनाश गोडगे, तोरकडी, सुहास गोरे, महेंद्र गुंजाळ, मनोहर मोरे यांनी गायकवाड यांच्या शेतातील दोडग्याच्या पिकात जाऊन छापा टाकला.
यावेळी एका शेतात विजय रघुनाथ गजे यांनी दोडक्याच्या शेतात गांजाची झाडे लावुन त्यांची जोपासना व संवर्धन केलेले दिसून आले. तर गांजाचा हिरवा पाला, असे १५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी वाटेकरी विजय रघुनाथ गजे (रा. वाशेरे) यांच्या विरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप हजारे करीत आहे.