Pakistani Goree Beauty Cream: संगमनेरमध्ये पाकिस्तानी 'गोरी ब्यूटी क्रीम'चा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

मानवी आरोग्यास घातक सौंदर्यप्रसाधनांवर छापा; दोन दुकानांतून १२,९०० रुपयांचा साठा जप्त, दुकानदाराविरुद्ध गुन्हा
Pakistani Goree Beauty Cream
Pakistani Goree Beauty CreamPudhari
Published on
Updated on

संगमनेर: पाकिस्तानमध्ये तयार होणारी मानवी आरोग्यास घातक मानली जाणारी ‘गोरी ब्यूटी क्रीम' आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ची संगमनेरच्या बाजारात विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून १२ हजार ९०० रुपयांचा पाकिस्तानात उत्पादित झालेला सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला.

Pakistani Goree Beauty Cream
Mula Dam Water Storage: मुळा धरण भरतीच्या उंबरठ्यावर; आजच 20 हजार दलघफूचा टप्पा पार होण्याची शक्यता

दुकानदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पाकिस्तानात तयार होणाऱ्या गोरी ब्यूटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीमची संगमनेरमध्ये विक्री केली जात होती. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.प्रशासनाच्या पथकाने संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी (दि. १) दुपारी गोल्डन मार्केटमधील दुकानावर छापा टाकत १२ हजार ९०० रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला.

Pakistani Goree Beauty Cream
Ahilyanagar Teachers Bank AGM: शिक्षक बँकेच्या सभेत घोषणांचा पाऊस; निवडणुकीपूर्वी व्याजदर कपात, कर्जवाढ अन् शेड्यूल्ड बँकेचा मुद्दा स्थगित

याप्रकरणी संबंधित दुकानदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अन्न व औषध निरीक्षक सोमनाथ मुळे (अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीनुसार शाहीद रियाज शेख (वय ३६, रा. शिकलकर लेन, मोगलपुरा, पुणे रोड व दुसरे दुकान रहेमतनगर जोर्वे रोड) संगमनेर याच्या दोन्ही दुकानांवर छापे टाकण्यात आले.

Pakistani Goree Beauty Cream
Shrigonda Soil Mafia: श्रीगोंद्यात माती माफियांचा वाढता संघर्ष; गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांची मोठी कारवाई सुरू

तपासणीदरम्यान पाकिस्तान इन पाकिस्तान स्टँडर्ड, असा उल्लेख असलेल्या गोरी ब्यूटी क्रीम व गोरी डे अँड नाईट क्रीमचा साठा आढळून आला. यामध्ये विविध किमतीचे बॉक्स जप्त करण्यात आले. या सौंदर्यप्रसाधनातील काही घटक त्वचा, किडनी तसेच मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

Pakistani Goree Beauty Cream
Nashik Pune Railway: नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी निर्णायक लढा; ९ ऑगस्टला महामार्गावर एकाचवेळी चक्काजामची घोषणा

भारत देशात विक्रीसाठी परवानगी नसताना ही उत्पादने संगमनेरपर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचली, याचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे, बाबासाहेब सातपुते, विजय आगलावे, सागर नागरे यांच्या पथकाने औषध प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई केली.

logo
Pudhari News
pudhari.news