

नगर: कायनेटिक चौकातील एका खासगी रुग्णालयातून उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलेचे दागिने कोणीतरी चोरून नेले. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी घडली. (Latest Ahilyanagar News)
विकास पाराजी गिरे (रा. भाबूळगाव, ता. राहुरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गिरे यांच्या पत्नीने विषारी औषध सेवन केल्याने त्यांना उपचासाठी कायनेटिक चौकातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना पत्नीच्या गळ्यात दागिने होते. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी पत्नीच्या गळ्यात दागिने दिसून आले नाही. दागिन्याचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. पत्नीच्या गळ्यातील सुमारे 75 हजारांचे दागिने कोणीतरी चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.