Nilwande Dam Water Release: रब्बी पिके आणि पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा

लाभक्षेत्रात पाणीपातळी खालावली; २० नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी सोडण्याची निळवंडे पाटपाणी कृती समितीची मागणी
Nilwande Canal
Nilwande CanalPudhari
Published on: 
Updated on: 

संगमनेर: निळवंडे धरण लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी रब्बी पिकांची उभारणी करणे कठीण झाले आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी व पशुधनाचे हित लक्षात घेऊन, निळवंडे धरणातून रब्बी हंगामासह जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध होण्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

Nilwande Canal
Sujay Vikhe Patil: जिल्हा बँकेचे नवे पदाधिकारी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार? सुजय विखे पाटलांचे संकेत

यापूर्वी निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्राला मिळाले, मात्र या पाण्याला जवळपास चार महिने उलटले. दरम्यानच्या काळात परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी पिकांची पेरणी व उभारणी करण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

Nilwande Canal
Godavari Canal Water Release: कोपरगावच्या शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश; गोदावरी कालव्यांना २० नोव्हेंबरपासून पाणी

रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पाणी मिळण्यास आणखी विलंब झाल्यास पेरणीसह पिकांच्या वाढीचा महत्त्वाचा कालावधी हातातून निघून जाण्याची भीती आहे. त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुधन जगविण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याची उपलब्धता अडचणीत येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

Nilwande Canal
Nevasa Sugarcane Price Protest: ऊसदर वाढीसाठी नेवासा फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; आमदार लंघे रस्त्यावर

या बिकट पार्श्वभूमीवर निळवंडे धरणातून होणारे पुढील आवर्तन कोणताही विलंब न करता (दि. २० नोव्हेंबर) च्या दरम्यान सोडावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे. पाणी वेळेत उपलब्ध झाले तरचं रब्बी पिकांना संजीवनी मिळेल. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

Nilwande Canal
Rahuri Minor Girls Missing: राहुरी तालुक्यात तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

अन्यथा, रब्बी हंगाम हातातून जाण्याबरोबरच पशुधनाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर प्रभाकर आनंदा गायकवाड, प्रल्हाद लहानु गागरे, रंगनाथ धोंडीबा लोंढे, केशव सदाशिव मुसमाडे, मच्छिंद्र काळे, एम. डी. घोरपडे, विलास रंगनाथ गुळवे, अण्णासाहेब बजाबा वाघे, विजय रामचंद्र मगर आणि संतोष त्रिंबक राऊत यांची नावे आहेत. अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तम भैरू घोरपडे व सचिव अण्णासाहेब वाघे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.