

श्रीरामपूर: कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, आपल्यासाठी कायदा हाच सर्वोच्च असून ही गोष्ट लक्षात ठेवून कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करून श्रीरामपूरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करावे, असे आदेश राज्याचे अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांनी दिले.
श्रीरामपुरात वाढलेल्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून त्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी (दि. २०) राज्याचे अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांनी भेट देऊन श्रीरामपुरातील गुन्हेगारी जगताची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे उपस्थित होते. राज्याचे अपर पोलिस महासंचालक निखील गुप्ता आणि राज्य गुप्तवार्ताचे आयुक्त शिरीष जैन हे श्रीरामपुरात दाखल झाले.
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, जिल्हा पोलिस प्रमुख मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डिवायएसपी जयदत्त भवर आदींनी या सर्वांचे शहर पोलिस ठाण्यात स्वागत केले. श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यानंतर याबाबतचा आढावा घेत सुमारे दोन तास प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत श्रीरामपुरात वाढलेल्या गुन्हेगारीचा इतिहास, गुन्हेगारांची पार्श्वभूमीवर सूचना दिल्या. त्यानंतर सर्वपक्षीय नेते, नगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, सचिन गुजर, वैशाली चव्हाण, सुनील मुथा, व्यापारी मर्चंटचे गौतम उपाध्ये, निलेश नागले, रवी पाटील, सुभाष त्रिभुवन यांनी शहरातील वाढलेली गुन्हेगारी, त्यांच्याकडून होणारे त्रास आणि कायमच शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देऊन ही गुन्हेगारी तातडीने संपवावी, अशी मागणी केली.
तरूण व्यावसायिक आकाश दुबैय्या याची भरदिवसा किरकोळ कारणावरून निघृण हत्या झाल्यानंतर श्रीरामपूर शहरात तरूण व्यावसायिक आकाश दुबैय्या याची भरदिवसा किरकोळ कारणावरून निघृण हत्या झाल्यानंतर शहरात सर्वपक्षीयांच्या वतीने श्रीरामपुरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी श्रीरामपरकरानी गुन्हेगारीविरोधात चार दिवस बेमुदत शहर बंद ठेवत सर्वपक्षीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
गुन्हेगारी मोडीत काढण्याची अपेक्षा
श्रीरामपुरात पसरलेली दहशत याशिवाय श्रीरामपुरात चाललेल्या गुन्हेगारीच्या गुन्हेगारीची माहिती अपर पोलिस महासंचालक यांनी घेतल्याचे समजते. अपर पोलिस महासंचालक आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त यांच्या भेटीमुळे श्रीरामपुरच्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.