Nashik Pune Semi High Speed Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेरात जागरण गोंधळ; काकोडकर समितीची मुदत संपली

अकोले-संगमनेर मार्गेच रेल्वे करण्याची मागणी; शासनाच्या भूमिकेचा निषेध करत मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन
Nashik Pune Semi High Speed Railway Protest
Nashik Pune Semi High Speed Railway ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

संगमनेर: डॉ. काकोडकर समितीला दिलेली साठ दिवसांची मुदत पुर्ण झाली असून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग अकोले-संगमनेर मार्गेच व्हावा, यासाठी काल शनिवारी (दि. ३) बस स्थानक परिसरात नागरिकांच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Nashik Pune Semi High Speed Railway Protest
Kopardi Case: कोपर्डी प्रकरणाला नवा टप्पा; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची घटनास्थळी पाहणी

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सुरुवातीला संगमनेर-अकोले मार्गेच मंजूर झाला होता. सर्वेक्षण होवून जमीन अधिगृहीत करण्यात आली होती. मात्र नंतर नारायणगाव येथील दुर्बिणीचे कारण देत मार्गात बदल करण्यात आला. या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, चाकण परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनांनी आक्रमक भूमिका घेत दोन महिन्यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते.

Nashik Pune Semi High Speed Railway Protest
Ahilyanagar Water Shortage: पावसाने पाठ फिरवताच जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; पावणेतीन लाखांसाठी १५० टँकर धावताहेत

याची दखल घेत राज्य शासनाने या रेल्वे मार्गाबाबत अभ्यास करण्यासाठी डॉ. काकोडकर याचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. याला साठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपूनही काहीच हालचाल न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर बसस्थानकावर काल शनिवारी दुपारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Nashik Pune Semi High Speed Railway Protest
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत विस्थापितांची मोटबांधणी; प्रस्थापितांना आव्हान देण्याची तयारी

यावेळी आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी शासनाच्या दुटप्पी भुमिकेचा निषेध केला. जुन्या मार्गे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, चाकण मार्गेच रेल्वे झाली पाहिजे, अशी मागणी केली. या मागणीसाठी देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीच्या वतीने संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Nashik Pune Semi High Speed Railway Protest
District Bank Election: सोनईत थोरात-विखे-गडाखांची गुप्त भेट; जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट

या आंदोलनात देवगाव ग्रामस्थ, रेल्वे समर्थक आणि नागरिक सहभागी झाले होते. मधुसूदन शिंदे, रविंद्र लामखडे, कोमल म्हस्के, शंकर पावसे, शिबा गायकवाड, दत्ता ढगे, सागर कोल्हाळ, संजय देशमुख, संतोष शिंदे, मुकुंद शिंदे, तुषार पानसरे आणि किरण देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, विनय सावंत, राजाभाऊ अवसक, गणपत लामखडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायब तहसीलदार माळवे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news