Ahilyanagar Water Shortage: पावसाने पाठ फिरवताच जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; पावणेतीन लाखांसाठी १५० टँकर धावताहेत

श्रीगोंद्यात ४ गावे, ४९ वाड्यांना टंचाईची झळ; पाथर्डीत सर्वाधिक ६८ टँकर सुरू
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्‍थिती गंभीर झाली असून, दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्‍यालाही टंचाईची झळ बसली असून, या तालुक्‍यातील ४ गावे आणि ४९ वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाल्‍याने ४ टँकर सुरु करण्‍यात आले आहेत. श्रीगोंद्यासह नऊ तालुक्‍यांतील पावणेतीन लाख लोकसंख्‍येसाठी १५० टँकर धावत आहेत. पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक ६८ टँकर सुरु आहेत.

Water Tanker
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत विस्थापितांची मोटबांधणी; प्रस्थापितांना आव्हान देण्याची तयारी

जिल्ह्यात एप्रिलपासून टँकर सुरु झाले. मेअखेरपर्यंत १६२ टँकर धावत होते. जूनपासून टँकर कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, जून महिन्‍यात तुटीचा पाऊस झाला. जुलै महिन्‍यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्‍यामुळे जवळपास ६० टँकर कमी झाले. त्‍यानंतर ऑगस्‍ट व सप्‍टेंबर या दोन्‍ही महिन्‍यांत पावसाने दडी मारली. त्‍यामुळे भूजलपातळी अधिकच खालवून आठ तालुक्‍यांतील टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या दिवसेंदिवस वाढतच गेली.

Water Tanker
District Bank Election: सोनईत थोरात-विखे-गडाखांची गुप्त भेट; जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट

संगमनेर, नेवासा, अहिल्‍यानगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर या आठ तालुक्‍यांत २६ सप्‍टेंबरअखेरपर्यंत १२९ गावे आणि ७०१ वाड्यांत पाणीटंचाई निर्माण होऊन १३७ टँकरव्‍दारे जनतेला पाणीपुरवठा सुरु होता. चार महिन्‍याचा पावसाळा संपला असून, जिल्ह्यात २९९मिलिमीटर ६६.७२ टक्‍के पावसाची नोंद झाली. ३५ टक्‍के तुटीचा पाऊस झाल्‍याने आता टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या दिवसेंदिवस वाढणार आहे.

Water Tanker
Jamkhed Robbery: नान्नजमध्ये मध्यरात्री धाडसी दरोडा; बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत १४.६३ लाखांचा ऐवज लंपास

त्‍याचा प्रत्‍यय श्रीगोंदा तालुक्‍यात आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या तालुक्‍यातील ४ गावे आणि ४९ वाड्यांतील जनतेला पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई निर्माण झाली. त्‍यामुळे या टंचाईग्रस्‍त गावांतील १२ हजार ७७० लोकसंख्‍येसाठी प्रांताधिकार्‍यांनी ४ टँकर मंजूर करुन ते धावू लागले आहेत. दरम्‍यान, गेल्‍या चार-पाच दिवसांत संगमनेर तालुक्‍यात १,पाथर्डी तालुक्‍यात ३, शेवगाव तालुक्‍यात ३, कर्जत तालुक्‍यात २ टँकर वाढले आहेत.

Water Tanker
Ahilyanagr Marriage Fraud: लग्नासाठी ४ लाख घेतले; महिनाभरातच वधूची फसवणूक उघड, राहुरीत खळबळ

गेल्‍या वर्षी १९४ टक्‍के यंदा फक्‍त ५१ टक्‍के पाऊस

गेल्‍या वर्षीच्‍या सप्‍टेंबर महिन्‍यात पाथर्डी तालुक्‍यात अतिवृष्‍टी झाली. या तालुक्‍यात सर्वाधिक ९२१ मिलिमीटर म्‍हणजे १९४ टक्‍के पावसाची नोंद झाली होती. या जोरदार पावसाने तालुक्‍यातील रस्‍ते, पूल वाहून गेले होते. काढणीला आलेल्‍या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केले होते. याच तालुक्‍यात यंदा सरासरी २४२.२ मिलिमीटर म्‍हणजे ५१ टक्‍के पावसाची नोंद झाली. आजमितीस या तालुक्‍यात सर्वाधिक ६८ टँकर धावत आहेत.

तालुकानिहाय टँकरसंख्‍या

संगमनेर : ७, नेवासा : २, अहिल्‍यानगर : १९, पारनेर : ४, पाथर्डी : ६८, शेवगाव : २०, कर्जत : १९, जामखेड : ७, श्रीगोंदा : ४.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news