Nashik Pune Railway Route Change: नाशिक–पुणे रेल्वे मार्ग बदलावर संगमनेरमध्ये तीव्र विरोधाची लाट

सत्यजित तांबे यांचा इशारा—संगमनेरमार्गेच रेल्वेची मागणी; सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पेन आणि ऑनलाईन पिटीशनला सुरुवात
Nashik Pune Railway Route Change
Nashik Pune Railway Route ChangePudhari
Published on
Updated on

संगमनेर: राजकीय स्वार्थामुळे नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. तांत्रिक कारण न सांगता मार्ग बदलल्याचा आरोप करत संगमनेरमार्गेच रेल्वेसाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी दिला.

Nashik Pune Railway Route Change
Nagar Palika EVM Security: SRPF चा पहारा, २४ तास सीसीटीव्ही! पहा अशी आहे EVM सीसीटीव्ही लाईव्ह पाहण्याची सुविधा

नाशिक-पुणे रेल्वे शिर्डी, अहिल्यानगर मार्गे जाणार असल्याची घोषणा लोकसभेत रेल्वेमंत्र्यांनी केल्यानंतर व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक झाली. तीत जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.

Nashik Pune Railway Route Change
Komal Kale Arrest: इन्स्टाग्रामवर 50 हजार फॉलोअर्स, पण खरा उद्योग ST त प्रवाशांना लुबाडण्याचा; शेवगावच्या रीलस्टारला अटक

यावेळी आमदार सत्यजित तांबे, राजाभाऊ अवसक, हिरालाल पगडाळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री, डॉ. मैथिली तांबे, बाळकृष्ण महाराज करपे, अमर कतारी आदी उपस्थित होते.

Nashik Pune Railway Route Change
Dadh Khurd Water Donation: दाढ खुर्दच्या भूमिपुत्रांचे आदर्श जलदान! नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या ३५ तरुणांनी भागवली ३० हजार भाविकांची तहान

आ. तांबे म्हणाले, की नाशिक-पुणे रेल्वे मंजूर झाल्यानंतर या भागात भूसंपादन करण्यात आले. शेतकऱ्यांना पैसेही देण्यात आले; मात्र राजकीय डाव साधत जीएमआरडीचे कारण सांगून रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे. जगामध्ये पंधरा ठिकाणी जीएमआरडीच्या प्रोजेक्टजवळून रेल्वे गेलेली आहे. त्यामध्ये कुठलीही अडचण नाही. याचा कोणताही अभ्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केलेला नाही. हा पुण्याहून पुणतांबा असा उलटा प्रवास असून नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेर, मंचर, चाकण मार्गे झाली पाहिजे. यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे.

Nashik Pune Railway Route Change
Garden Green Heaven: कोपरगावात अवतरला हिरवा स्वर्ग! पोस्ट ऑफिस परिसर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने नटला देखण्या उद्यानाने

शुक्रवारपासून तालुक्यात सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पिंग व ऑनलाई पिटिशन दाखल करण्यात येणार असून यात सर्व नागरिकांनी राजकारण विरहीत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार तांबे यांना फोन करून रेल्वेसाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची ग्वाही दिली.

नाशिक-पुणे रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पैसेही दिले. मात्र सरकार बदलले आणि रेल्वेचा मार्ग पळवला गेला. विकासकामात होणारे राजकारण चुकीचे आहे. नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे. त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारू. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे.

बाळासाहेब थोरात, माजी मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news