Mula Dam Water Allocation: मुळा धरणाच्या पाणीवाटपाचे नियोजन; रब्बीसाठी दोन आवर्तने सोडणार

उजव्या कालव्यातून पिण्यासाठी एक आवर्तन; धरणात ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक
Mula Dam
Mula DamPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: मुळा उजवा कालव्‍यातून बंधाऱ्यांना पिण्यासाठी जानेवारी ते मार्च २०२७ पर्यंत एक आवर्तन निश्‍चित करण्‍यात आले. या कालावधीतच मुळा डावा कालव्‍याव्‍दारे रब्‍बी हंगामी पिकांसाठी दोन आवर्तन सोडण्‍याचा निर्णय कालवा सल्‍लागार समितीच्‍या बैठकीत घेण्‍यात आला. दरम्‍यान, पाणीवापराचे योग्य नियोजन, वितरणातील कार्यक्षमता आणि पाण्याची बचत यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

Mula Dam
Maharashtra Farmers Long March: शेतकरी-कष्टकऱ्यांचा अकोले ते मुंबई लॉंग मार्च सुरू

मुळा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी (दि.२५) विळदघाट येथील डॉ. विठठलराव विखे पाटील फाऊंडेशन येथील वैद्यकीय महाविद्यालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, विठ्ठल लंघे, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी सीईओ आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पाच्या पाणीवापराचे नियोजन आणि कालव्यांद्वारे पाणी वितरणासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली.

Mula Dam
Sangamner Water Shortage: संगमनेर तालुक्यात दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई; ९ गावांसह १७ वाड्यांना टँकरचा आधार

पाण्याचे महत्त्व लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पाणी वितरण प्रक्रियेत समन्वय राखून पाण्याचा योग्य उपयोग होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

Mula Dam
Ahilyanagar Medicine Purchase: अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून कोट्यवधींची औषध खरेदी; ५० लाख पॅरासिटामॉल गोळ्यांचा समावेश

अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी मुळा प्रकल्प सिंचन क्षेत्र, लाभक्षेत्रातील पर्जन्यमान, सन २०२६-२७ खरीप हंगाम पाणीवापर तसेच पाण्याचे नियोजन याविषयी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.

Mula Dam
Ahilyanagar Sugarcane Price: अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा; कारखानदारांची घोषणा रखडली

१६.७ टीएमसी पाणीसाठा शिल्‍लक

मुळा धरणात गेल्‍या वर्षी २५ ऑक्‍टोबर रोजी शंभर टक्‍के म्‍हणजे २६ हजार दलघफू इतका पाणीसाठा होता. यंदा फक्‍त ६४ टक्‍के म्‍हणजे १६ हजार ७३४ दलघफू इतका पाणीसाठा शिल्‍लक आहे. धरणाचा मृत पाणीसाठा साडेचार हजार दलघफू इतका आहे. त्‍यामुळे उर्वरित १२ हजार २३४ दलघफू इतका उपयुक्‍त पाणीसाठा ऑगस्‍ट २०२७ पर्यंत वापरायचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news