Ahilyanagar Industrial Project: अहिल्यानगरच्या हरेगाव मळ्यात ४२०० एकर जागेवर संरक्षण व ऊर्जा प्रकल्प; जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना

डीआरडीओ, महाऊर्जा आणि निबे ऑर्डनन्सला जमीन वाटप; ३९०० एकर जमीन शेतकऱ्यांना देण्याचाही निर्णय
Land
Land Pudhari
Published on
Updated on

नगर/मुंबई: अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील ४२०० एकर जागा दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य आणि सौरऊर्जा प्रकल्प या महत्त्वपूर्ण उद्योगांना देण्यास महसूल विभागातर्फे मंगळवारी मंजुरी देण्यात आली. तरुणांच्या हाताला काम आणि औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

Land
PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा; जिल्ह्यातील 5.66 लाख शेतकऱ्यांना 111 कोटींचा लाभ

दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी डीआरडीओला (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) १५०० एकर, सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १२०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टीरीज लिमिटेडला १५०० एकर अशी ४२०० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. बैठकीला शिक्षणमंत्री दादा भुसे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

Land
Pathardi Repeater Exam: पाथर्डीतील रिपीटर परीक्षा केंद्र संशयाच्या भोवऱ्यात; डमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

या संस्थांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २३०० एकर आणि अन्य १६०० एकर अशी एकूण ३९०० एकर अकारी पड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

Land
Pudhari Campus To Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’: श्रीरामपूर व अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन

४९ वर्षांच्या करारावर देणार जमीन

या संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरारावर (लीजवर) देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिएकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले असून, तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे.

Land
Sangamner Bribery Case: मंडळ अधिकाऱ्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी तरुण रंगेहाथ अटकेत

जमिनीचे वाटप

  • १५०० एकर दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकासासाठी डीआरडीओला

  • १२०० एकर सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला

  • १५०० एकर संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डनन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टरीज लिमिटेडला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news