PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा; जिल्ह्यातील 5.66 लाख शेतकऱ्यांना 111 कोटींचा लाभ

किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान; संगमनेर तालुक्याला सर्वाधिक 11.88 कोटी रुपये
PM Kisan Samman Nidhi
PM Kisan Samman NidhiPudhari
Published on
Updated on

लोणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 'किसान सन्मान निधी' योजनेचा २३ वा हप्ता जिल्ह्यातील ५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १११ कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

PM Kisan Samman Nidhi
Pathardi Repeater Exam: पाथर्डीतील रिपीटर परीक्षा केंद्र संशयाच्या भोवऱ्यात; डमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेच्या २३ व्या हप्त्याचे अनुदान नुकतेच जिल्ह्यातील ५ लाख ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

PM Kisan Samman Nidhi
Pudhari Campus To Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’: श्रीरामपूर व अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन

जिल्ह्यातील तालुकावार मिळालेले अनुदान खालीलप्रमाणे आहे. अकोले : ३५ हजार ०९० शेतकऱ्यांना ७ कोटी १ लाख ८० हजार रुपये, जामखेड : ३० हजार ९१४ शेतकऱ्यांना ६ कोटी १८ लाख २८ हजार रुपये, कर्जत : ४४ हजार ०९५ शेतकऱ्यांना ८ कोटी ८१ लाख ९० हजार रुपये, कोपरगाव : २८ हजार ३६९ शेतकऱ्यांना ५ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये, अहिल्यानगर : ३१ हजार ३५३ शेतकऱ्यांना ६ कोटी २७ लाख ६ हजार रुपये, नेवासा : ५४ हजार ५९८ शेतकऱ्यांना १० कोटी ९१ लाख ६ हजार रुपये, पारनेर : ५१ हजार १३६ शेतकऱ्यांना १० कोटी २२ लाख ७२ हजार रुपये, पाथर्डी : ४० हजार ९७० शेतकऱ्यांना ८ कोटी १९ लाख ४० हजार रुपये,

PM Kisan Samman Nidhi
Sangamner Bribery Case: मंडळ अधिकाऱ्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी तरुण रंगेहाथ अटकेत

राहाता : २४ हजार ७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ९४ लाख २२ हजार रुपये, राहुरी : ३८ हजार ३६१ शेतकऱ्यांना ७ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये, संगमनेर : ५९ हजार ४०३ शेतकऱ्यांना ११ कोटी ८८ लाख ६ हजार रुपये, शेवगाव : ४३ हजार ७९८ शेतकऱ्यांना ८ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपये, श्रीगोंदा : ५० हजार ९०१ शेतकऱ्यांना १० कोटी १८ लाख २ हजार रुपये, श्रीरामपूर : २२ हजार ६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ५२ लाख ४ हजार रुपयांचे रूपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

PM Kisan Samman Nidhi
Anna Hazare RTI Protest: माहिती अधिकार कायद्यावरील दुरुस्त्या मागे घ्या; अन्यथा उपोषण : अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 'किसान सन्मान निधी' योजनेमध्ये सातत्य ठेवले आहे. तसेच राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news