Mohatadevi Temple: मोहटादेवी गडावर लाखो भाविकांची मांदियाळी; दर्शनासाठी अलोट गर्दी

नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला भाविकांचा जनसागर; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहनांना प्रवेशबंदी, टप्प्याटप्प्याने पार्किंगची व्यवस्था
Mohatadevi Temple
Mohatadevi TemplePudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: रविवारची सुट्टी आणि शारदीय नवरात्रोत्सवातील आठव्या माळेचा योग साधत श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शनिवार आणि रविवार या सलग दोन दिवसांत भाविकांचा अलोट जनसागर उसळल्याने गडाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. वाहनांसह पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. ‘जगदंबा देवी माता की जय’, ‘मोहटादेवी माता की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला.

Mohatadevi Temple
Hiware Bazar Water Shortage: हिवरे बाजारला ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट; काटकसरीने दुष्काळाचा सामना

शनिवारी पहाटेपासूनच भाविकांचा ओघ सुरू झाला होता. रात्री गर्दीचा उच्चांक गाठल्याने दोन तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली. रविवारीही गर्दी कायम राहिल्याने पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहनांना दूरवरच रोखून टप्प्याटप्प्याने पार्किंगच्या ठिकाणी पाठविले. पाथर्डी-बीड राज्य मार्गासह तारकेश्वर गड रस्ता, मोहरी-भांडेवाडी रस्ता आणि मोहटे गावाकडील मार्गांवरही मोठी गर्दी झाली होती.

Mohatadevi Temple
Abhishek Kalamkar Anticipatory Bail: माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

गर्दीचे नियोजन करण्यासाठी देवस्थान समितीने व्हीआयपी रस्ता बंद केला. त्यामुळे स्थानिक पोलीस, सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवकांना ये-जा करताना कसरत करावी लागली. मात्र, या निर्णयामुळे दर्शनाच्या रांगेत न थांबता दर्शन घेण्याच्या प्रकारांना आळा बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक नितीन खंडारे हे शनिवारी रात्रीपासून पोलीस पथकासह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. नवरात्रोत्सवात मोहटादेवीचे दररोज साकारले जाणारे आगळेवेगळे रूप, गाभाऱ्यातील आकर्षक फुलांची सजावट तसेच विविध फळे आणि प्रसादाची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

Mohatadevi Temple
Godavari Water Protest: शेतकरी आंदोलनादरम्यान तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याची गोदावरीत उडी

देवीचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविक सर्व अडथळे पार करून गडावर पोहोचत होते. मंदिर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी आणि स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत होते.भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, खासगी सुरक्षारक्षक, देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी, स्वयंसेवक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते. दर्शनरांगेत खेळती हवा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी होती.

Mohatadevi Temple
Jamkhed Police Constable Attack: जामखेडमध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या गर्दीत पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला

सातव्या आणि आठव्या माळेनिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडत देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाला मदत केली. गडाच्या पायथ्याशी असलेली हार-फुले, पेढे व प्रसादाची दुकाने, खेळण्यांची दुकाने तसेच हॉटेल व्यवसायिकांच्या दुकानांमध्येही भाविकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. पोलिसांनी रविवारी गडावर वाहनांना जाण्यास बंदी घालून ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली. त्यामुळे गडावरील वाहतूक कोंडी टळून भाविकांना दिलासा मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news