Godavari Water Protest: शेतकरी आंदोलनादरम्यान तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याची गोदावरीत उडी

नागमठाण पुलावरील प्रकार; आंदोलकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, तीन केटी बंधारे ५० टक्के भरण्याची मागणी
Water Protest
Water ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान गुरुवारी नागमठाण पुलावर अघटीत घटना होता होता थांबली. श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ हे आंदोलकांशी चर्चा करत असतानाच त्यांच्यासमोरच महाकाळवाडगाव येथील शेतकरी बाळासाहेब घोगरे यांनी पुलावरून नदीत उडी मारली. प्रसंगावधान राखत अन्य आंदोलकांनी त्यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

Water Protest
Jamkhed Police Constable Attack: जामखेडमध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या गर्दीत पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला

नदीपात्रातील बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेचे वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीच्या पुलावर आंदोलन सुरू आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यास परिसरातील गावांतील पिण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी भूमिका शेतकरी संघटनेने मांडली आहे.

Water Protest
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधासाठी एकसूत्रीपणाचा अभाव; राम शिंदेंचा आरोप

गुरूवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ, नाशिक व अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनीही आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम राहिली. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब घोगरे यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

Water Protest
Cynthia Farrar Grave: महात्मा फुलेंना मुलींच्या शाळेची प्रेरणा देणाऱ्या सिंथिया फरार यांची समाधी सापडली

मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. नागमठाण येथील आंदोलन आणि तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभाग काय भूमिका घेतो, याकडे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नांदूरमधमेश्वरचे पाणी मुरले कोठे?

नांदूर मधमेश्वर येथून पाणी सोडलेले अपेक्षित पाणी बंधाऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे. पाणी सोडल्याच्या तारखा, पाण्याचे प्रमाण, कालावधी आणि बंधाऱ्यांपर्यंत पाणी न पोहोचण्याची कारणे यांची लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Water Protest
Banned Tobacco Mawa: पाथर्डीत प्रतिबंधित सुगंधी मावा जप्त; एकाला अटक, दोघे फरार

वांजरगाव, खानापूर आणि कमळपूर येथील केटी बंधारे तातडीने किमान ५० टक्के भरून देण्याची मागणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यांतील सुमारे १०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यांशी संबंधित आहे.

गणेश सुभाष तांबे, अध्यक्ष, शेतकरी संघटना.

आंदोलनस्थळी जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बंधाऱ्यांमध्ये पाणी न पोहोचण्याबाबत प्रत्येकजण भूमिका मांडत असताना हा प्रकार घडला. नदीच्या काठाजवळ उभ्या असलेल्या संबंधित व्यक्तीने उडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, उपस्थित लोकांनी त्याला तत्काळ पकडले.

मिलिंद वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news