Hiware Bazar Water Shortage: हिवरे बाजारला ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट; काटकसरीने दुष्काळाचा सामना

यंदा अवघा ४०.९ मिलिमीटर पाऊस; दोन दिवसांतून एकदा प्रत्येक कुटुंबाला ५०० लिटर पाणी, नवरात्रोत्सवात सलग २२ व्या वर्षी पाण्याचा ताळेबंद
Hiware Bazar Water Shortage
Hiware Bazar Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

टाकळी खातगाव: आदर्श गाव हिवरे बाजार येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२६-२७ चा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला. त्यात भविष्यासाठी ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट दर्शविण्यात आली असून, गावाने काटकसरीचा अवलंब करत यंदाच्या दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

Hiware Bazar Water Shortage
Abhishek Kalamkar Anticipatory Bail: माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नवरात्रोत्सवात विशेष ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्याची परंपरा गावाने सलग २२ व्या वर्षीही कायम ठेवली. आदर्श गाव प्रकल्प व संकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी हा ताळेबंद सादर केला. धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपसंचालक ऋषिराज गोसकी, तहसीलदार मिलिंद कुलथे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक सोहम साळुखे, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ॲड. विक्रम वाडेकर आदी उपस्थित होते.

Hiware Bazar Water Shortage
Godavari Water Protest: शेतकरी आंदोलनादरम्यान तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याची गोदावरीत उडी

पोपटराव पवार यांनी सांगितले की, नवरात्री उत्सव अनादीकाळापासून असून त्यात पाण्याची गुणवत्ता,बि याण्याची उगवणक्षमता व ९ माळी म्हणजे परागीकरण म्हणून नवरात्री उत्सव हा मानवी भवितव्याची पाणी व आरोग्य सुरक्षितेची परंपरा आहेत. त्याला फक्त भक्ती व पूजेचे स्वरूप दिले आहे. हिवरे बाजारने नवरात्र भक्तीला कृषीची जोड दिली. त्यामुळेच हिवरे बाजार पर्यावरणसंतुलित दारिद्र्यमुक्त गाव झाले आहे. सन १९९५ पासून हिवरे बाजारमध्ये पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पीकपद्धतीचे नियोजन केले जात आहे.

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने ग्रामस्थांनी खरीप हंगामातील कांद्याची रोपे जगविण्यासह जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि फळबागा टिकविण्यासाठी प्रयत्न केले. गावात तीन ठिकाणी पर्जन्यमापक आहेत. त्यांच्या नोंदींनुसार गावातील सरासरी पर्जन्यमान ४०.९ मिलिमीटर आहे. शेजारील चास आणि केडगाव शासकीय मंडळांत अनुक्रमे ५१.१ आणि ५६.१ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. हिवरे बाजारच्या इतिहासातील य़ंदाचे हे सर्वांत कमी पर्जन्यमान आहे.

Hiware Bazar Water Shortage
Jamkhed Police Constable Attack: जामखेडमध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या गर्दीत पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला

उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत गावाला बाहेरून पाणी आणण्याची गरज भासणार नाही, असा अंदाज आहे. भूजलाचा अनियंत्रित उपसा करून आर्थिक समृद्धी मिळविण्याचा हव्यास कमी केला आणि सामाजिक शिस्त पाळली, त्यामुळेच गावाला या संकटाचा सामना करणे शक्य होत आहे, असेही पवार म्हणाले.

सन २०२६-२७ च्या पाण्याच्या ताळेबंदानुसार, गावात यंदा झालेल्या ४०.९ मिलिमीटर पावसातून गावाच्या शिवारात सुमारे ३९.९५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले असून, गावाच्या वापरासाठी २७.०५ कोटी लिटर पाणी उपलब्ध असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. गावाच्या विविध गरजांसाठी वार्षिक ३५.२३ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असल्याने उपलब्धता आणि गरज यामध्ये तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आणि पिकांचे नियोजन उपलब्ध पाण्यानुसार करणे अत्यावश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले. सरपंच विमलताई ठाणगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, सखाराम पादीर यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Hiware Bazar Water Shortage
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधासाठी एकसूत्रीपणाचा अभाव; राम शिंदेंचा आरोप

८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट

पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ७.७१ कोटी लिटर, खरीप पिकांसाठी २७ कोटी लिटर, रब्बी पिकांसाठी १२६.५ कोटी लिटर, प्रस्तावित उन्हाळी पिकांसाठी २४ कोटी लिटर, बारमाही पिकांसाठी २१ कोटी लिटर आणि इतर वापरासाठी ०.५४ कोटी लिटर पाण्याची गरज नमूद करण्यात आली आहे. ताळेबंदात भविष्यासाठी ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट दर्शविण्यात आली असून, मागील वर्षी साठविलेल्या २.६८ कोटी लिटर राखीव भूजलाचा वापर करून पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

दोन दिवसांतून एकदा पाणी

गावात एकूण ४३९ विहिरी असून, त्यापैकी ४३० विहिरींना सध्या पाणी आहे. नऊ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील सहापैकी एका हातपंपातच पाणी येत आहे. सार्वजनिक नळपाणीपुरवठ्याच्या विहिरीतही पाणी उपलब्ध असून, प्रत्येक कुटुंबाला दोन दिवसांतून एकदा ५०० लिटर पाणी दिले जात आहे. गेल्या २० वर्षांत नळपाणीपुरवठा योजनेवर दुरुस्तीचा खर्च अवघा ८० हजार असून पाणीयोजना महिला चालवितात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news