Mayor Jyoti Gade Attendance Check: महापौर ज्योती गाडे यांनी कर्मचारी उपस्थिती तपासली; कामचुकारांवर कडक कारवाई इशारा

महापौरांनी 150 कर्मचाऱ्यांपैकी 41 उशिरा आल्याचे निदर्शनास आणून पुढील काळात कठोर कारवाईची सूचना दिली
Mayor Jyoti Gade Attendance Check
Mayor Jyoti Gade Attendance CheckPudhari
Published on
Updated on

नगर: महापौर ज्योती गाडे यांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली. या तपासणीदरम्यान सुमारे 150 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचारी नियोजित वेळेनंतर कामावर येताना आढळून आले. या वेळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी चांगलेच सुनावले आणि पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

Mayor Jyoti Gade Attendance Check
Pathardi Police Allegation: वाहतूक कोंडीत पोलिसांवर वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप

महापौर ज्योती गाडे यांनी महापौरपदाची सूत्रे 6 फेब्रुवारी रोजी स्वीकारल्यानंतर तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, गळ्यात ओळखपत्र असावे तसेच नागरिकांची कामे प्रामाणिकपणे पार पाडावीत, अशा सूचना दिला होत्या. मात्र, अनेक कर्मचारी या सूचनांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत असल्याने महापौर गाडे यांनी स्वतःच तपासणी मोहीम हाती घेतली.

Mayor Jyoti Gade Attendance Check
Ghargaon Water Crisis: म्हसवंडीतील आदिवासी महिलांनी ग्रामसभा उधळून लावली

सोमवारी (दि. 9) सकाळी 9.30 वाजता महापालिकेच्या गेटवर उभे राहून त्यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. या वेळी सुमारे 41 कर्मचारी उशिरा आले. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे त्यांना वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांचा रोष पदाधिकाऱ्यांवर व्यक्त होतो. यापुढे कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.

Mayor Jyoti Gade Attendance Check
Ahilyanagar Commercial Gas Shortage: अहिल्यानगरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेलचे दर वाढले

जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू; मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौर ज्योती गाडे यांनी दिला.

Mayor Jyoti Gade Attendance Check
Nagar Pune Highway Repair: नगर–पुणे महामार्ग दुरुस्तीला गती; पाठपुराव्याला यश

शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीची झलक

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून महापौर ज्योती गाडे या महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभ्या राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासत होत्या. भर उन्हात उभे राहून त्यांनी 11.30 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी त्यांची कडक शिस्त पाहायला मिळाली. नागरिकांच्या हितासाठी पदाचा उपयोग झाला पाहिजे. जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत नागरिकांना न्याय देण्याचे काम करीन, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामकाजाच्या शैलीत स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीची झलक दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news