Nagar Pune Highway Repair: नगर–पुणे महामार्ग दुरुस्तीला गती; पाठपुराव्याला यश

जीवघेण्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रिय; नारायणगव्हाण चौपदरीकरणावरही चर्चा
Development
DevelopmentPudhari
Published on
Updated on

पारनेर: नगर-पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेले जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. जिल्हा प्रशासनाने महामार्गाच्या दुरुस्ती व सुरक्षिततेच्या कामांना गती दिली आहे.

Development
Rahuri Municipal Development: राहुरीत 2.5 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, तसेच भूमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांचे स्वागत करण्यात आले. नारायणगव्हाण चौपदरीकरणाच्या उर्वरित कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना दूरध्वनीद्वारे तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Development
Womens Day Speech: आत्मविश्वास हाच महिलांचा खरा दागिना: स्नेहलता कोल्हे

महामार्गावरील वाढती वाहतूक, अरुंद रस्ता, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, साईडपट्टीची दुरवस्था, तुटलेले डिव्हायडर तसेच नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे प्रलंबित काम या विविध प्रश्नांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी व संबंधित विभागांनी महामार्ग दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे.

Development
Women Bike Rally Gudipadwa: गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अहिल्यानगरमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली

भुमिअभिलेख विभागाच्या संपामुळे संबंधित अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी नारायणगव्हाण चौपदरीकरणासह नगर-पुणे महामार्ग पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके व शरद पवळे यांनी सांगितले.

Development
Banana Export Iran War Impact: इराण युद्धाचा फटका; केळी निर्यात ठप्प

नागरिकांनी आपल्या गावाजवळ सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांवर लक्ष ठेवून पारदर्शक व दर्जेदार काम होण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news