Pathardi Police Allegation: वाहतूक कोंडीत पोलिसांवर वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप

व्हिडिओ व्हायरल; नागरिकाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली
Pathardi Police Allegation
Pathardi Police AllegationPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: मढीच्या यात्रेदरम्यान पाथर्डी येथे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, या प्रकरणी एका नागरिकाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

Pathardi Police Allegation
Ghargaon Water Crisis: म्हसवंडीतील आदिवासी महिलांनी ग्रामसभा उधळून लावली

निलेश बाबूराव शिंदे (वय 42, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, 8 मार्च रोजी सकाळी तिसगाव येथे जात असताना कारने (एमएच 20 एचएन 0008) जात होते. त्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक विलास पुजारी वाहनांच्या काचा फोडत असल्याचे दिसले. त्यांनी शिंदे यांच्या वाहनाची काच फोडण्याचा प्रयत्न केला.

Pathardi Police Allegation
Ahilyanagar Commercial Gas Shortage: अहिल्यानगरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेलचे दर वाढले

मात्र काच खाली असल्याने ती फुटली नाही. त्यानंतर पुजारी यांनी काठीने वाहनाच्या उजव्या बाजूच्या दरवाजावर मारून नुकसान केले. जाब विचारल्यावर पुजारी यांनी शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आई पद्मा शिंदे वाहनातून खाली उतरल्या असता त्यांनाही शिवीगाळ करून काठीने पायावर मारले.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते. प्रवाशांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले, मात्र मी कोणाचीही गाडी फोडलेली नाही किंवा कोणाला मारहाण केलेली नाही.

विलास पुजारी, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news