Ahilyanagar Commercial Gas Shortage: अहिल्यानगरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेलचे दर वाढले

सिलिंडर 3 हजार रुपयांना विकले जात आहेत; जिल्हा प्रशासनाने अवैध तुटवडा रोखण्यासाठी तपासणी पथके नेमली
Commercial Gas Shortage
Commercial Gas ShortagePudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथके नियुक्त केली आहेत. मात्र, दुसरीकडे शहर आणि जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

Commercial Gas Shortage
Nagar Pune Highway Repair: नगर–पुणे महामार्ग दुरुस्तीला गती; पाठपुराव्याला यश

त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर घेण्यासाठी 3 हजार रुपये मोजावे लागत आहे. परिणामी हॉटेलमधील पदार्थांचे दर वाढले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध विक्री वा वापर रोखण्यासाठी चार तपासणी पथके नियुक्त केली आहेत.एका पथकाकडे चार तालुके असणार आहेत. ही पथके गॅस एजन्सीची तपासणी करणार आहेत.

Commercial Gas Shortage
Rahuri Municipal Development: राहुरीत 2.5 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

दरम्यान, जिल्हाभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. काही ठिकाणी एजन्सीकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अहिल्यानगर शहरात व्यावसायिक सिलिंडर चढ्या भावाने विकली जात आहेत.

Commercial Gas Shortage
Womens Day Speech: आत्मविश्वास हाच महिलांचा खरा दागिना: स्नेहलता कोल्हे

तारकपूर परिसिरातील एका हॉटेल व्यावसायिकाला तीन हजार रुपयाला सिलिंडर विकत घ्यावे लागले. त्यामुळे आगामी काही दिवसांत हॉटेलचे दर वाढलेले दिसणार आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

Commercial Gas Shortage
Women Bike Rally Gudipadwa: गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अहिल्यानगरमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली

केवळ आठ हजारांचा साठा

जिल्ह्यात चार दिवस पुरेल इतका आठ हजार इतका व्यावसायिक सिलिंडरचा साठा आहे. दररोज 2 हजारांपेक्षा अधिक सिलिंडरची आवश्यकता आहे. सध्या नवीन साठा उपलब्ध झालेला नाही. शिल्लक साठ्यातूनच सिलिंडर वितरित केले जात असल्याचे एका एजन्सीधारकाने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news